युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतातील प्रत्येक गल्ली-बोळ हे खेळाचे मैदान बनायला हवे, प्रत्येक पोडियमवर भारताचा ध्वज उंच फडकताना दिसायला हवा : डॉ. मनसुख मांडवीय
Posted On:
12 SEP 2025 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजावी आणि प्रत्येक मुलामध्ये खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले आहे. "भारतातील प्रत्येक गल्ली-बोळ हे हे खेळाचे मैदान बनायला हवे आणि प्रत्येक पोडियमवर भारताचा ध्वज उंच फडकताना दिसायला हवा," असे त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली येथे स्पोर्टस्टार एक्स केपीएमजी प्लेकॉम बिझनेस ऑफ स्पोर्ट्स समिट 2025च्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना डॉ. मांडवीय यांनी सांगितले की खेळ लोकचळवळ बनली पाहिजे जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यात सहभागी झाला पाहिजे, असे ते म्हणाले. "संडेज ऑन सायकल्स" यासारखे प्रतीकात्मक उपक्रम तळागाळातील स्तरापर्यंत तंदुरुस्तीचे महत्त्व सांगतात असे सांगून प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजावी असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात क्रीडा परिसंस्थेला चालना देणाऱ्या अनेक सुधारणांची मालिका सुरु असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 'फिट इंडिया' आणि 'खेलो इंडिया' या उपक्रमांचे महत्त्व विशद करुन ते म्हणाले की या उपक्रमांनी अत्यंत यशस्वीपणे नागरिकांमध्ये जागरूकता आणि उत्साह निर्माण केला आहे. "क्रीडा क्षेत्रातील आपल्या सुधारणा सतत सुरू राहिल्या पाहिजेत. आपल्या देशात प्रचंड प्रतिभा आहे. त्यासाठी संधी, संगोपन आणि आदराची आवश्यकता आहे."

भारताला जगातील आघाडीच्या पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी एक ठळक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित केला. खेळांमध्ये धोरणांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि सुशासन यांचे महत्त्व अधोरेखित करुन ते म्हणाले की "भारताच्या क्रीडा परिसंस्थेला परिवर्तित करण्याच्या उद्देशाने आपण याआधीच दहा वर्षे आणि 25 वर्षांच्या धोरणात्मक योजनेवर कार्य सुरु केले आहे. ही दीर्घकालीन योजना आपल्याला विकसित भारताकडे वाटचाल करताना मार्गदर्शन करेल आणि पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार भारताला जगातील पाच सर्वोत्तम क्रीडा देशांमध्ये स्थान मिळवून देईल.”

भागधारकांशी विस्तृत सल्लामसलत करुन आणि जागतिक मापदंडांचे पालन करुन तयार केलेल्या खेलो भारत नीती - 2025 चा डॉ. मांडवीय यांनी उल्लेख केला. राष्ट्रहितावर लक्ष केंद्रित करुन एक भविष्यासाठी सज्ज, समावेशक आणि कामगिरीवर आधारित योजना तयार करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचे विश्लेषण केले आहे," असे ते म्हणाले.

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166080)
Visitor Counter : 2