सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या माध्यमातून भारताची समृद्ध ज्ञान परंपरा राष्ट्र आणि जगासमोर पुन्हा येत आहे : गजेंद्रसिंह शेखावत


भारताच्या ज्ञान वारशासंबंधी ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी दिल्लीत प्रारंभ

Posted On: 11 SEP 2025 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025

संस्कृती मंत्रालयाने 'ज्ञान भारतम्' चा प्रारंभ केला असून हा भारताच्या हस्तलिखीत वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी समर्पित एक ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रम आहे. या निमित्ताने, संस्कृती  मंत्रालयाच्यावतीने  11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे "हस्तलिखीत अमूल्य संग्रहाच्या माध्यमातून भारताच्या ज्ञान वारशाची पुनर्प्राप्ती" या विषयावर पहिली  ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. भारत आणि परदेशातील विद्वान, तज्ज्ञ, संस्था आणि सांस्कृतिक अभ्यासकांसह 1,100 हून अधिक सहभागींना एकत्र आणून, या परिषदेने भारताच्या हस्तलिखीत संपत्तीचे जतन, डिजिटायझेशन आणि ती संपूर्ण जगासमोर आणण्‍यासाठी चर्चा, विचारविनिमय आणि पुढे जाण्याचा मार्ग तयार करण्‍याच्या उद्देशाने एक सहयोगी व्यासपीठ तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या - 12 सप्टेंबर,  रोजी परिषदेमध्‍ये सहभागी होवून कार्यगटांचे सादरीकरण ऐकतील  आणि त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतील. तीन दिवसांच्या या चर्चासत्राचा समारोप 13 सप्टेंबर रोजी  होणार असून  समारोप सत्राचे  अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवणार आहेत.

उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून आज संस्कृती  मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संस्कृती मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, आव्हाने, संघर्ष आणि आक्रमणे येऊनही  हजारो वर्षांपासून टिकून राहिलेली भारताची समृद्ध ज्ञान परंपरा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ज्ञान भारतम मिशनद्वारे राष्ट्र आणि जगासमोर पुन्हा आणली जात आहे. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की,  ज्यावेळी लोक आपल्या  स्वतःच्या संस्कृतीच्या संपत्तीला जाणतात, ओळखतात आणि  संस्कृतीशी जोडले जातात, तेव्हाच आपल्या अस्तिवाविषयी खरा अभिमान निर्माण होतो. हे अभियान डिजिटायझेशन, भाषांतर आणि तांत्रिक नवोपक्रमाद्वारे हस्तलिखितांचे पुनरुज्जीवन करण्‍यासाठी शक्य असतील ते करण्याचा प्रयत्न करते. हजारो वर्षांपूर्वी, आपल्या ऋषी-मुनींनी त्यांच्या चर्चा, अनुभव आणि अनुभूतींद्वारे असे ग्रंथ तयार केले, जे आजही जगासाठी तितकेच प्रासंगिक आहेत जितके ते लिहिताना होते. मानवी जीवनाशी संबंधित मुख्य विषयांच्या सखोल अभ्यासावर आधारित हे ग्रंथ हजारो वर्षांनंतरही - मानवतेसाठी, पर्यावरणासाठी आणि संपूर्ण परिसंस्थेसाठी  महत्त्वपूर्ण असून, आज, यापुढेही त्यांचे संवर्धन करण्याची  आवश्‍यकता  आहे.


सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165857) Visitor Counter : 2
Read this release in: English