कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी से समृद्धी आणि विकसित भारत: शिक्षण आणि कौशल्य विकास धुरिणींचे आत्मनिर्भर भारतासाठीच्या रुपरेषेवर विचारमंथन


आत्मविश्वासपूर्ण आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास या पूरक शक्तींनी एकत्रित काम करण्याची गरज: धर्मेंद्र प्रधान

Posted On: 08 SEP 2025 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025

पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या आवाहनाला अनुसरून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) आणि शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि उच्च शिक्षण विभागांनी आज नवी दिल्लीतील कौशल भवन येथे संयुक्त उच्चस्तरीय परिसंवादाचे आयोजन केले.आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यकालीन रूपरेषा तयार करण्याच्या उद्देशाने "स्वदेशी से समृद्धी आणि विकसित भारत - शिक्षण आणि कौशल्यातील रणनीती" या व्यापक संकल्पनेंतर्गत ही चर्चा झाली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र संपन्न झाले.

या चर्चेत मिशन स्वदेशीचे दुहेरी आधारस्तंभ म्हणून शिक्षण आणि कौशल्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली. आत्मनिर्भर भारताची बीजे शालेय पातळीवरच रोवली पाहिजेत, ज्यामध्ये विद्यार्थी आत्मनिर्भरतेचे राजदूत म्हणून उदयास येतील यावर भर देण्यात आला. शैक्षणिक आणि कौशल्य संस्थांनी स्वदेशी उत्पादने, स्थानिक उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम केले पाहिजे. स्थानिक प्रबळ व्यक्तींमध्ये जागरूकता, नवोन्मेष आणि अभिमान निर्माण करण्यासाठी प्रदर्शने, वादविवाद, शैक्षणिक प्रकल्प आणि सामुदायिक मोहिमांचा उपयोग करण्याच्या महत्वावर प्रकाश टाकण्यात आला.

उपस्थितांना संबोधित करताना, धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांसह, स्वदेशीला समृद्ध आणि विकसित भारताचा मार्ग म्हणून स्थान देण्यासाठी एक धोरणात्मक रूपरेषा तयार केली जात आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रुजले पाहिजे, जिथे विद्यार्थी या मोहिमेचे पथदर्शी म्हणून उदयास येतील आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि समुदायांमध्ये स्वदेशी, नवोपक्रम आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना पसरवतील. आत्मविश्वासपूर्ण  आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य या पूरक शक्तींनी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी निदर्शनास आणली. 

 

सुषमा काणे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2164777) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi