युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित


आत्मनिर्भर व निरोगी  भारताप्रति  सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

Posted On: 07 SEP 2025 4:43PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ऐतिहासिक इंडिया गेट व कर्तव्य पथ परिसरात फिट इंडिया संडेज ऑन सायकलउपक्रमांतर्गत विशेष संकल्पना  गर्व से स्वदेशीमध्ये भारतात उत्पादित वस्तूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी खासदारांसोबत सायकल यात्रेत सहभाग घेतला.

फिट इंडिया संडेज ऑन सायकलउपक्रमाच्या 39 व्या सत्राचे आयोजन भारतीय रेल्वे सह संयुक्तपणे देशभरातल्या 8000 ठिकाणांवर करण्यात आले होते. नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये  सकाळी 7 वाजता झालेल्या कार्यक्रमात ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने 1500 सायकलस्वारांना व फिटनेस प्रेमींना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी संडेज ऑन सायकलच्या उपक्रमात गर्व से स्वदेशीया मोहिमेचा समावेश करण्यात आला होता. भारतीय क्रीडा उत्पादने व स्वदेशी फिटनेस ब्रँड्स यांनी तिथे विक्रीकेंद्रे उभारली होती.

संरक्षण राज्यमंत्री भगीरथ चौधरी , कृषी राज्यमंत्री संजय सेठ, खासदार नवीन जिंदाल, पुरूषोत्तम रूपाला, प्रभुभाई वसावा, हेमांग जोशी, सुभाष बराला, भोजराज नाग व रमेश बिधूरी यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जगातील सर्वात जास्त लांबीच्या रेल्वेमार्गाच्या जाळ्यावर धावणाऱ्या भारतीय रेल्वेचा यावेळी सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात आला. भारतीय रेल्वेच्या 250 हून अधिक कर्मचाऱ्यांनी या सायकल उपक्रमात सहभाग नोंदवला.

सायकल फेरीमार्ग पूर्ण केल्यानंतर डॉ. मांडवीय म्हणाले, "रविवारच्या सायकल फेरी कार्यक्रमाला आपल्या नागरिकांचा वाढता सहभाग पाहून मला आनंद होत आहे. ही आता लोक चळवळ म्हणून विस्तारत आहे आणि सक्रीय जीवनशैलीचा स्वीकार करण्याविषयी लक्षणीय जागरूकता निर्माण करत आहे. आज, मी खासदारांसमवेत 'गर्व से स्वदेशी'या संकल्पनेअंतर्गत सायकलिंग केले. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना भारतीय बनावटीची उत्पादने (मेड इन भारत) वापरण्याचे आवाहन करतो."

क्रीडा साहित्यावरील अलीकडेच झालेल्या जीएसटी कपातीविषयी बोलताना डॉ. मांडवीय म्हणाले, " बहुतांश क्रीडा साहित्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)12 टक्क्यांवरून 5 टक्के केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभार मानतो.यामुळे नागरिकांना या वस्तू परवडतील आणि त्यांना क्रीडा आणि तंदुरूस्तीशी निगडीत कार्यक्रमांमध्ये अधिक सक्रियतेने सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. तसेच अधिक मागणीमुळे भारतीय क्रीडा साहित्य उत्पादन केंद्रांचे उत्पादन वाढेल आणि क्रीडा परिसंस्था भक्कम होईल."

युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री रक्षा निखिल खडसे यांनी एक्स या त्यांच्या समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हणतात, "दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीयजी यांच्या नेतृत्वाखालील तंदुरूस्तीची उल्लेखनीय चळवळ असलेल्या #SundaysOnCycleच्या 39 व्या आवृत्तीत सहभागी होण्याची संधी लाभली ."

या कार्यक्रमात, सर्व सन्माननीय खासदार, ऑलिम्पिक विजेती साक्षी मलिक आणि साई संघटनेतील आणि भारतीय रेल्वेतील मान्यवर या कार्यक्रमात एकत्र आले आणि एकतेचे दर्शन घडवले. आम्ही, आत्मनिर्भर आणि तंदुरूस्त भारताप्रति आमची वचनबद्धता दृढ करतानाच एकत्रितपणे "#गर्वसेस्वदेशी"ची प्रतिज्ञा घेतली.

ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने संडेज ऑन सायकल चळवळीत सहभाग नोंदवल्यानंतर आनंद व्यक्त केला. देशातील नागरिकांमध्ये तंदुरूस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना देशासाठी पदक मिळवून देण्यासाठी सरकारकडून होत असलेले प्रयत्न तिने अधोरेखित केले.

***

सुषमा काणे / उमा रायकर / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164517) Visitor Counter : 2