रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमध्ये रस्ता सुरक्षेचे शिक्षण देणे हे जबाबदार नागरिक घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Posted On: 04 SEP 2025 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सहकार्याने रस्ते वाहतूक मंत्रालय, सर्व प्रादेशिक भाषांमधील शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रस्ते सुरक्षेचे धडे समाविष्ट करत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. देशभरातील तरुणांसाठी व्यापक जागरूकता मोहिमेची सुरुवात करण्यासाठी केंद्रीय शाळेत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

ते आज नवी दिल्ली येथे "व्हिजन झिरो: लाइफ फर्स्ट, ऑलवेज" या संकल्पनेभोवती केंद्रित असलेल्या यंदाच्या फिक्की रस्ते सुरक्षा पारितोषिक आणि परिसंवादाच्या  7 व्या पर्वाला संबोधित करत होते. रस्ता अपघातासंदर्भात रस्ते परिस्थितीत   कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी सामूहिक जबाबदारी आणि सक्रिय सार्वजनिक सहभागाचे महत्त्व गडकरी यांनी अधोरेखित केले.

"आपण नियम, अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधा मजबूत करत असताना, तंत्रज्ञानात अगणित प्रगती झालेली असूनही, रस्त्यावरील मानवी वर्तन बदलण्याचे सर्वात मोठे आव्हान कायम आहे. शिक्षण, जागरूकता आणि प्रशिक्षणासह आपल्या मुलांपर्यंत लवकर पोहोचणे हा यावरील सर्वोत्तम मार्ग आहे" असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

   

कार्यक्रमादरम्यान ठळकपणे मांडण्यात आलेल्या इतर प्रमुख उपक्रमांमधील आणि घोषणांमधील समाविष्ट बाबी:

  • वाहन सुरक्षेत वाढ करण्यासाठी भारत एनसीएपी (नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम) स्वीकारणे.
  • बस बॉडी कोडची अंमलबजावणी आणि रस्ता सुरक्षा ऑडिट
  • ट्रक चालकांसाठी सुरक्षित काम करण्याची परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी वातानुकूलित ट्रक केबिन आणि थकवा शोध प्रणाली.
  • अमिताभ बच्चन सारख्या दिग्गजांसह जागरूकता मोहिमा आणि शंकर महादेवन यांच्या संगीत सहकार्याने, देशभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी 22 भारतीय भाषांमध्ये  त्या अनुवादित करण्यात आल्या आहेत.
  • रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी राह-वीर योजनेअंतर्गत प्रत्येक घटनेसाठी 25,000 रुपयांचे बक्षीस.
  • पादचाऱ्यांची सुरक्षा आणि समावेशकता वाढविण्यासाठी अनिवार्य लिफ्ट-सक्षम फूट ओव्हरब्रिज आणि स्कूटर-सुलभ पायाभूत सुविधांचा प्रचार.
  • उच्च-जोखीम क्षेत्रे ओळखण्यासाठी, अपघातांच्या मूळ कारणांचे विश्लेषण करण्यासाठी आणि सुधारात्मक कृती अंमलात आणण्यासाठी डेटा-चालित रस्ते सुरक्षा ऑडिट.
  • निवृत्त व्यावसायिकांसह नागरिकांना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जागरूकता पसरविण्यासाठी स्वयंसेवा करण्यास प्रोत्साहित करणारे व्यापक  प्रयत्न.

सरकार प्रगतीशील धोरणे आणि सुरक्षा चौकटी सुरू करत असले तरी, रस्ते नियमांचे पालन करणे, वाहतूक नियमांचा आदर करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे ही प्रत्येक नागरिकाची सामायिक जबाबदारी असल्याचा पुनरुच्चार गडकरी यांनी भाषणाच्या समारोपावेळी केला.

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163940) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi