लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

सुयोग्य वेळी न्याय देऊन मानवी प्रतिष्ठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने लोकसभा अध्यक्षांचे सार्वजनिक चर्चेचे आवाहन


न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळाने जलद न्याय देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज : लोकसभा अध्यक्ष

Posted On: 03 SEP 2025 8:52PM by PIB Mumbai


 

वेळेवर न्याय मिळवून मानवी प्रतिष्ठेचे प्राधान्य राखण्याच्या दृष्टीने विविध भागधारकांमध्ये सार्वजनिक चर्चा आणि संवादाची तातडीची गरज असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज अधोरेखित केले. कायदेशीर आणि प्रशासकीय व्यवस्थेतील असंख्य अडथळे न्यायाला विलंब करत असल्याची पुष्टी त्यांनी केली. सर्वांना जलद आणि निष्पक्ष न्याय मिळावा या महत्त्वाच्या प्रश्नावर नागरिक आणि विचारवंतांना चिंतन करण्याचे आवाहन बिर्ला यांनी केले. त्यांनी अधोरेखित केले की डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी मानवता, समानता, न्याय, सामाजिक-आर्थिक हक्क आणि स्वातंत्र्यांची तत्त्वे संविधानात खोलवर अंतर्भूत केली असून संविधानातील कलमे आणि संविधान सभेतील चर्चेत मानवी प्रतिष्ठेवर विशेष भर देण्यात आला आहे.

बिर्ला यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित 11 व्या डॉ. एल. एम. सिंघवी स्मृती व्याख्यानात हे विधान केले, ज्याचा विषय होता “संविधानाचा आत्मा असणारी मानवी प्रतिष्ठा: 21 व्या शतकातील न्यायिक प्रतिबिंब”.

बिर्ला यांनी न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांना त्यांचे कार्य वाढविण्यासाठी आणि सर्वांना जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी सहकार्याने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या लोकशाही संस्थांना बळकटी देण्यासाठी आपले कौशल्य देणाऱ्या विद्वानांचे त्यांनी कौतुक केले. चालू सुधारणांवर चर्चा करताना त्यांनी नमूद केले की भारत लोकशाही मूल्यांशी सुसंगत राहण्यासाठी आपली कायदेशीर चौकट सतत विकसित करत आहे, तसेच मानवी प्रतिष्ठा आणि न्यायाचे रक्षण करण्याशी संबंधित आव्हाने कायम आहेत हे मान्य करताना, व्यापक सुधारणा आणि विचारशील उपायांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

माजी खासदार, कायदेतज्ज्ञ, राजनैतिक अधिकारी आणि विद्वान डॉ. एल.एम. सिंघवी यांचे जीवन आणि वारशावर भाष्य करताना बिर्ला यांनी त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असल्याचे वर्णन केले. डॉ. सिंघवी यांनी संविधान तज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक आणि कवी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि एक असा वारसा सोडला जो आजही प्रेरणा देत आहे.  बिर्ला यांनी डॉ. सिंघवी यांचा केवळ भारतावरच नव्हे तर जगभरातील संविधानांच्या मसुद्यावरही खोलवर प्रभाव पडला होता याची आठवण करून दिली. भारतीय लोकशाही, संस्कृती, ज्ञान, व्यापार आणि परदेशातील भारतीयांच्या प्रतिष्ठेला चालना देण्यातील डॉ. सिंघवी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. सिंघवी यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व सर्व भारतीयांना नवोन्मेष, सर्जनशील विचार आणि राष्ट्रासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यास प्रेरित करते, असे बिर्ला म्हणाले.

यावेळी भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

***

शैलेश पाटील / नंदिनी मथुरे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2163554) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi