नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शाश्वत विमान इंधन (एस ए एफ) हा हवाई वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठी एक व्यावहारिक आणि तात्काळ उपाय : केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू


एसएएफ व्यवहार्यता अहवाल सादर - शाश्वत विमान इंधनांमध्ये जागतिक आघाडी मिळविण्यासाठी भारताचा पथदर्शक

Posted On: 03 SEP 2025 1:31PM by PIB Mumbai

 

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेच्या (आयसीएसओ) भागीदारीने आणि युरोपीय महासंघाच्या सहकार्याने आज येथे भारतासाठी शाश्वत विमान इंधन (एसएएफ) व्यवहार्यता अभ्यास अधिकृतपणे सादर केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, नागरी हवाई वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा, नागरी विमान वाहतूक महासंचालक फैज अहमद आणि आयसीएओच्या हवाई वाहतूक ब्युरोच्या पर्यावरण उपसंचालक जेन हुपे यांनी संबोधित केले.

नवी दिल्लीतील उडान भवन येथे आयोजित दोन दिवसांच्या कार्यशाळेत या अभ्यासावर चर्चा केली जात आहे, ज्यामध्ये आयसीएओ, ईएएसए, डीजीसीए‌, उद्योग भागीदार आणि अनेक सरकारी विभागांचा सहभाग आहे, जो या इंधनाकडे बघण्याचा संपूर्ण सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो.

या ऐतिहासिक कार्यक्रमात भागधारकांचे स्वागत करताना मंत्र्यांनी भारताच्या शाश्वत विमान वाहतूक वाढीमध्ये एस एएफच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. कॉर्सिया आदेशानुसार, 2027 पर्यंत 1% , 2028 पर्यंत 2% तर 2030 पर्यंत 5% मिश्रण करत एस ए एफ उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताच्या सज्जतेची त्यांनी पुष्टी केली.

मंत्री म्हणाले, “एस ए एफ हा हवाई वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठीचा एक व्यावहारिक आणि तात्काळ उपाय आहे, ज्यामध्ये पारंपरिक इंधनाच्या तुलनेत जीवनचक्र CO उत्सर्जन 80% पर्यंत कमी करण्याची क्षमता आहे”. त्यांनी पुढे असे अधोरेखित केले की 750 दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त उपलब्ध बायोमास आणि जवळपास 230 दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त कृषी अवशेषांसह भारताकडे केवळ स्वतःची एस ए एफ मागणी पूर्ण करण्याचीच क्षमता नव्हे तर जागतिक नेता आणि निर्यातदार म्हणून उदयास येण्याची क्षमता देखील आहे.

एस ए एफ व्यवहार्यता अहवाल हा भारतात एक मजबूत एस ए एफ परिसंस्था निर्माण करण्याच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे स्वप्न दीर्घकालीन धोरणात्मक चौकटीवर आधारित असून ते शाश्वत विमान इंधनांचे उत्पादन आणि वापर या दोन्हींचे समर्थन करते. पुरवठा-बाजूची मजबूत गतिशीलता आणि ऊर्जा पिके, कृषी कचरा आणि महानगरपालिका घनकचरा यासारख्या कमी कार्बन-तीव्रतेच्या फीडस्टॉक्सच्या महत्त्वपूर्ण स्रोतांसह भारताकडे एस ए एफ उत्पादनात जागतिक नेता म्हणून उदयास येण्याची प्रचंड क्षमता आहे.

***

शैलेश पाटील / नंदिनी मथुरे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163311) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil