भारतीय स्पर्धा आयोग
येस बँकेचे काही भागभांडवल आणि मतदानाचे अधिकार यांचे अधिग्रहण करण्यास सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला सीसीआयची मान्यता
Posted On:
02 SEP 2025 6:43PM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला येस बँकेचे काही भागभांडवल आणि मतदानाचे अधिकार यांचे अधिग्रहण करण्यास मान्यता दिली आहे. प्रस्तावित संयोजन सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (एसएमबीसी) द्वारे येस बँकेच्या भागभांडवलाच्या आणि मतदानाच्या अधिकारांच्या अधिग्रहणाशी संबंधित आहे.
एसएमबीसी ही जपानस्थित व्यावसायिक बँक पूर्ण मालकीची उपकंपनी असून सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपची एक मुख्य कार्यकारी संस्था आहे. एसएमबीसी ही भारतातील परदेशी बँक असून तिच्या शाखा नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई येथे आहेत आणि गांधीनगरमधील गिफ्ट सिटी येथे ऑफशोअर शाखा आहे. एसएमबीसी भारतात कर्जाची तरतूद, ठेवी स्वीकारणे आणि पत पत्रांची तरतूद यासारख्या विविध बँकिंग सेवा प्रदान करते.
येस बँक ही एक सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी असून ती खाजगी क्षेत्रातील बँक आहे जी विविध बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करते. ही एक पूर्ण-सेवा बँक आहे जी किरकोळ, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कॉर्पोरेट पक्षकारांना विविध उत्पादने, सेवा आणि तंत्रज्ञान-चालित डिजिटल सेवा प्रदान करते.
आयोगाचा सविस्तर आदेश लवकरच येईल.
***
माधुरी पांगे / नंदिनी मथुरे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163195)
Visitor Counter : 5