वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते कापूस खरेदीमध्ये किमान आधारभूत किंमत सुलभ करण्यासाठी सीसीआयचे शेतकरी-केंद्रित कपास किसान ॲपचे अनावरण
Posted On:
02 SEP 2025 5:31PM by PIB Mumbai
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून कापसाच्या अविरत खरेदीसाठी वस्त्रोद्योग मंडळाअंतर्गत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) नव्याने विकसित केलेल्या कपास किसान अॅपचे अनावरण आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे अॅप शेतकऱ्यांना स्व-नोंदणी, स्लॉट बुकिंग आणि पेमेंट ट्रॅकिंगची सुविधा देते. हे अॅप शेतकऱ्यांना पेमेंट ट्रॅकिंगची सुविधा प्रदान करते - ज्यामुळे कापूस खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुविधा आणि गती येते.

हे शेतकऱ्यांसाठीचे पहिले मोबाईल अॅप आमच्या कापूस उत्पादकांना कापसाची विक्री सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. नोंदणीपासून ते पेमेंट ट्रॅकिंगपर्यंतच्या महत्त्वाच्या पायऱ्यांचे संगणकीकरण करून आम्ही वेळेवर, पारदर्शक आणि निष्पक्ष एमएसपी ऑपरेशन्स सुनिश्चित करत आहोत. शेतकऱ्यांना पडत्या किमतीत विक्रीपासून रोखण्याकरिता आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाला गती देण्यासाठी आमची बांधिलकी ते अधिक दृढ करते असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी यावेळी सांगितले.

या अॅपच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये शेतकरी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी सुरक्षितपणे नोंदणी करू शकतात, प्रतीक्षा वेळ आणि गर्दी कमी करण्यासाठी नियुक्त खरेदी केंद्रांवर डिजिटल वेळापत्रक, गुणवत्ता मूल्यांकन, स्वीकृत प्रमाण, पेमेंट प्रक्रिया आणि अनेक भारतीय भाषांसाठी समर्थनासह वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस यावर रिअल-टाइम स्थिती अद्यतने समाविष्ट आहेत.

हे अॅप कापूस शेतकऱ्यांना खात्रीशीर किमान आधारभूत किंमत खरेदीद्वारे कोणत्याही अडचणींपासून संरक्षण करण्यास मदत करेल, प्रत्यक्ष कागदपत्रे कमी करेल आणि खरेदी केंद्रांवर वेळ वाचवेल, पारदर्शकता वाढवेल आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर वेळ निवडण्याची परवानगी देऊन नियोजन सुधारेल असेही केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले.
***
माधुरी पांगे / वासंती जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163189)
Visitor Counter : 9