संरक्षण मंत्रालय
सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे पहिले प्रशिक्षण स्क्वाड्रन दाखल
ही भेट म्हणजे नैऋत्य हिंदी महासागर प्रदेशातील लांब पल्ल्याच्या प्रशिक्षण तैनातीचा भाग
Posted On:
02 SEP 2025 4:55PM by PIB Mumbai
तरुण मनांचे प्रशिक्षण होत असतानाच 'मैत्रीचे सेतू' बांधण्यासाठी भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉड्रन (1टीएस) ची आय एन एस तीर, आय एन एस शार्दुल आणि सीजीएस सारथी ही जहाजे 01 सप्टेंबर 2025 रोजी सेशेल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल झाली आहेत. 1टीएस सध्या नैऋत्य हिंदी महासागर प्रदेशात लांब पल्ल्याच्या प्रशिक्षण तैनातीवर आहे.
बंदरावर आगमन झाल्यावर सेशेल्स डिफेन्स फोर्सच्या (एस डी एफ) वाद्यवृंदाने त्यांचे औपचारिक स्वागत केले, जे दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत सागरी संबंधांचे निदर्शक आहे. भारतीय नौदलाचा सलामीवृंद आणि या वाद्यवृंदाचे 1 टीएस जहाजावर समानतेने संचलन झाले.
या भेटीदरम्यान वरिष्ठ अधिकारी 1टीएस कॅप्टन टिजो के जोसेफ हे सेशेल्स सरकारच्या मंत्रालयातील महत्त्वाच्या मान्यवरांची तसेच एसडीएफ आणि भारतीय उच्चायुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गाठभेट घेणार आहेत. बंदर भेटीदरम्यान व्यावसायिक आदानप्रदान, क्रॉस डेक भेटी आणि एसडीएफ कर्मचाऱ्यांशी प्रशिक्षण संवाद यांचे नियोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामुदायिक सहभागाचा भाग म्हणून, योगाभ्यास सत्रे, नौदल वाद्यवृंद सादरीकरण, क्रीडा सामने तसेच सामाजिक पोहोच कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
सेशेल्समध्ये तैनात करण्यात आलेले 1टीएस म्हणजे 2025 मधील भारतीय नौदलाची सेशेल्समधील तिसरी बंदरभेट आहे. यामुळे भारतीय नौदलाचा मजबूत द्विपक्षीय सहभाग आणि नैऋत्य हिंदी महासागर प्रदेशातील ‘महासागर’ च्या व्यापक दृष्टिकोनाशी आनुषंगिक सागरी भागीदारी अधोरेखित होते.
PO0S.jpeg)
IOAI.jpeg)
***
माधुरी पांगे / नंदिनी मथुरे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163177)
Visitor Counter : 7