दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाने डीजीपिन उपक्रमाच्या बळकटीकरणासाठी ईएसआरआय इंडिया(ESRIइंडिया)बरोबर केला सामंजस्य करार
Posted On:
01 SEP 2025 7:35PM by PIB Mumbai
टपाल विभागाने (DoP) ईएसआरआय इंडिया टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (ESRI इंडिया) या भौगोलिक माहिती प्रणाली (GSI)सॉफ्टवेअर आणि सोल्यूशन्स प्रदात्यासमवेत सामंजस्य करार केला आहे.
या कराराअंतर्गत, टपाल विभाग डिजीपिन पोर्टलसाठी ESRI इंडियाकडील उच्च क्षमतावान प्रतिमा आणि रस्त्याचे नकाशे (स्ट्रीट बेसमॅप्स) वापरू शकणार आहे. त्याशिवाय, ESRI इंडिया च्या Living Atlas पोर्टलसमवेत डीजीपिनचे एकत्रीकरणही शक्य होणार आहे. त्यामुळे भौगोलिक माहिती प्रणाली( GIS) समुदायासाठी उपलब्ध होईल. तसेच, भविष्यात डिजिपिन सेवांच्या सुरळीत एकत्रीकरणासाठीदेखील ESRI इंडिया टपाल विभागाला तांत्रिक सहाय्य प्रदान करेल.

Esri इंडिया च्या नकाशा-आधारित सोल्यूशन्सचा उपयोग करून डिजिपिन (DIGIPIN) प्रणाली अधिक भक्कम आणि नागरिकांसाठी अनुकूल करण्यासाठी या प्रणालीच्या विकास आणि अंमलबजावणीस पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
नवी दिल्लीत डाक भवन इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय टपाल विभाग आणि ESRI इंडिया च्या प्रतिनिधींनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162939)
Visitor Counter : 2