वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कापड उद्योगाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सरकारने कापड उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेची अर्ज मुदत वाढवली


अर्ज खिडकी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत खुली राहील

Posted On: 01 SEP 2025 7:22PM by PIB Mumbai

 

उद्योगातल्या भागधारकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त आणि उत्साही प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने कापड उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेची अर्ज मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये अर्ज मागवल्यानंतर, मानवनिर्मित परिधान, मानवनिर्मित वस्त्र आणि तांत्रिक कापड क्षेत्रातून 22 नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. सरकारने संभाव्य गुंतवणूकदारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. पीएलआय कापड योजनेअंतर्गत भारतात कापड उत्पादनामुळे निर्माण झालेल्या वाढत्या बाजारपेठेचा आणि विश्वासाचा परिणाम म्हणून उद्योगाच्या या योजनेत अधिक गुंतवणूक करण्याच्या उत्साहावर आधारित, कापड पीएलआय योजनेची अर्ज खिडकी पुन्हा उघडण्यात येत आहे. ही खिडकी 24.09.2021 रोजी अधिसूचित पीएलआय कापड योजना आणि 28.12.2021 रोजी जारी केलेल्या पीएलआय कापड योजना मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वेळोवेळी सुधारित केलेल्या अटी व शर्तींवर उघडण्यात येत आहे. या योजनेची अर्ज खिडकी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत खुली राहील आणि अर्ज https://pli.texmin.gov.in/ या ऑनलाइन पोर्टलवर स्वीकारले जातील. अर्ज खिडकी बंद झाल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आतापर्यंत, पीएलआय योजनेअंतर्गत 74 सहभागी कंपन्यांची निवड करण्यात आली आहे, ज्यांनी 28,711 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची हमी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे संपूर्ण मानवनिर्मित कापडाच्या मूल्य साखळीतल्या कापड उत्पादनांना चालना मिळेल.

***

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2162932) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati