युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात आयोजित क्रीडा दिन समारंभात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे सहभागी

Posted On: 29 AUG 2025 8:45PM by PIB Mumbai

छत्रपती संभाजीनगर, 29 ऑगस्ट 2025 


दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला आज (एनसीओई) भेट दिली.

या कार्यक्रमादरम्यान खडसे यांनी  राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राचे नाव, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र औरंगाबाद,बदलून  राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र ,छत्रपती संभाजी नगर असे अधिकृतपणे  करत त्याचे अनावरण केले. यावेळी खासदार आणि माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, तसेच उपसंचालक मोनिका घुगे आणि सहाय्यक संचालक सुमेश तरोडेकर यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

स्वतःच्या उदाहरणातून तंदुरुस्तीसाठी आवाहन

फिट इंडिया चळवळीप्रती सरकारची असलेली वचनबद्धता बळकट करण्यासाठी आणि आपल्या उदाहरणाद्वारे आदर्श घालून देण्यासाठी एक उत्साही पाऊल म्हणून, खडसे यांनी देशातील अव्वल खेळाडू आणि क्रीडा शास्त्रज्ञांसह आयोजित एका  फिटनेस सत्रात सक्रियपणे भाग घेतला. या सत्राद्वारे शारीरिक आरोग्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदर्शित करण्यात आला, ज्यात व्यावसायिक वॉर्म-अप ड्रिल, प्रगत स्ट्रेचिंग तंत्रे आणि कोर स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग अशा प्रकारच्या विशिष्ट व्यायामप्रकारांचा समावेश होता. सर्व वयोगटातील नागरिकांना व्यायाम, हा  त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी प्रेरित करणे हा,त्यांच्या सहभागाचा उद्देश होता.

राज्यमंत्री खडसे यांनी यावेळी येथील खेळांच्या सुविधा आणि क्रीडा विज्ञान प्रयोगशाळांनाही भेट दिली तसेच निवासी खेळाडू आणि प्रशिक्षकांशी त्यांच्या प्रशिक्षण पद्धती समजून घेण्यासाठी संवाद साधला. त् "लठ्ठतामुक्त भारत" या पंतप्रधान मोदी यांच्या  दृष्टिकोनाचा पुनरुच्चार त्यांनी केला, तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तंदुरुस्तीचे महत्त्व म्हणजे राष्ट्रीय विकासाचा आधारस्तंभ आहे, असे सांगत त्यांचे महत्त्व  अधोरेखित केले.

भारतीय खेळांसाठी एक नवीन अध्याय

तळागाळापासून ते उच्चभ्रू पातळीपर्यंत एक चैतन्यशील क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी आखलेल्या ; एक व्यापक आराखडा असलेल्या 'खेलो भारत नीती' या परिवर्तनकारी धोरणावर खडसे यांनी या कार्यक्रमात प्रकाश टाकला. क्रीडा विज्ञानातील प्रगतीचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंना आवाहन त्यांनी केले. 

आरोग्यदायी जीवनशैली ही एका सक्षम व्यक्ती आणि एका सामर्थ्यशाली राष्ट्राचा पाया आहे, असे सांगत  राज्यमंत्री खडसे यांनी एसएआय छत्रपती संभाजीनगरच्या विकासात कॉर्पोरेट क्षेत्राला सहभागी होण्याचे आवाहन केले.

उत्कृष्टतेचा वारसा

या कार्यक्रमात एनसीओईची महत्त्वपूर्ण कामगिरी आणि एक आघाडीची क्रीडा सुविधा म्हणून त्याची असलेली क्षमता यावर देखील प्रकाश टाकण्यात आला. या केंद्राकडे उच्च दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याची एक उत्तम परंपरा  आहे, त्यांच्या खेळाडूंनी विविध प्रकारच्या खेळांतून एकूण 87 पदके जिंकली आहेत. गेल्या दोन वर्षांतच त्यांनी 32 आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत. केंद्रातील खेळाडू मुष्टियुद्ध (बॉक्सिंग),भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग), तलवारबाजी, धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक्स आणि हॉकी तसेच पॅरा-तिरंदाजी आणि पॅरा-फेन्सिंग  यासह विविध खेळांमध्ये भाग घेतात.

हे केंद्र महाराष्ट्रातील सर्वोत्तम क्रीडा सुविधांपैकी एक असून ऑलिंपिक प्रशिक्षण केंद्र क्षमता असल्याचे कार्यक्रमादरम्यान, डॉ.भागवत कराड यांनी या केंद्राची प्रशंसा करताना सांगितले.या प्रदेशात "फिट इंडिया चळवळीला चालना देण्यात या केंद्राची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमानंतर, खडसे यांनी निवासी खेळाडू आणि प्रशिक्षकांशी संवाद साधला, तेथील सुविधांचा आढावा घेतला आणि त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीही समजून घेतल्या. 

सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2162094) Visitor Counter : 16
Read this release in: English , Urdu