संरक्षण मंत्रालय
लष्करी रुग्णालय संशोधन आणि संदर्भ संस्थेद्वारा (R&R) ALLY प्रणालीच्या उपयोगाने पहिली रोबोटिक कस्टम लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी
Posted On:
28 AUG 2025 5:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
भारताने लष्करी वैद्यकीय सेवेअंतर्गत एक महत्वाचे यश प्राप्त केले. लष्करी रुग्णालय संशोधन आणि संदर्भ संस्थेने (AHRR) 28 ऑगस्ट 2025 रोजी ALLY या ॲडाप्टिव्ह मोतीबिंदू उपचार प्रणालीचा वापर करून रोबोटिक कस्टम लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ही संस्था अशी शस्त्रक्रिया करणारी भारतातील पहिली सरकारी, तर दक्षिण आशियातील दुसरी संस्था ठरली आहे. या यशामुळे नेत्ररोग विभागाने पहिल्या फेम्टो - सेकंड लेझर असिस्टेड मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या (FLACS) माध्यमातून रोबोटिक, ब्लेडलेस आणि संगणक - मार्गदर्शित डोळ्यांच्या शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात यशस्वीपणे प्रवेश केला आहे.
ब्रिगेडियर एस.के. मिश्रा यांनी एका 61 वर्षांच्या रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. पारंपारिक शस्त्रक्रिया अजूनही प्रभावी आहे, मात्र त्याचवेळी FLACS या पद्धतीअंतर्गत फेम्टोसेकंड लेझरमुळे डोळ्यांच्या बुबुळाचे छेद, डोळ्यातील पडद्याला छिद्र पाडणे, आणि मोतीबिंदूचे तुकडे करणे यासारख्या शस्त्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे हे मायक्रॉन (1 मीटरचा 10 लाखावा भाग) पातळीवर स्वयंचलितपणे अत्यंत अचूकतेने पार पाडले जातात. त्यामुळे FLACS ही तंत्रज्ञानाच्या पातळीवर मोठी प्रगत पद्धती ठरली आहे.
लष्करी रुग्णालय संशोधन आणि संदर्भ संस्थेच्या कार्यपद्धतीत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाल्याच्या घडामोडीतून, सशस्त्र दलांची आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्वात प्रगत,सुरक्षित आणि प्रभावी आरोग्य सेवा देण्याची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित झाली आहे. FLACS या पद्धतीच्या माध्यमातून लष्करी वैद्यकीय सेवेअंतर्गत अचूकता आणि सर्वोत्तम परिणाम अशा दोन्हींची सुनिश्चिती झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सशस्त्र दलांचे महासंचालक सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांच्या मार्गदर्शनाखाली, लष्करी रुग्णालय संशोधन आणि संदर्भ संस्थेचा नेत्ररोग विभागाने डोळ्यांची निगा राखण्यातील आपल्या उत्कृष्टतेची आणि नवोन्मेषाची परंपरा अधिक बळकट केली आहे.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161593)
Visitor Counter : 24