मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अश्ववर्गीय प्राण्यांमधला ग्लँडर्स या ग्रंथीरोग निर्मूलनासाठी सुधारित राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर; सरकारकडून या प्राण्यांमधील आजार नियंत्रणासाठी अधिक बळकट उपाययोजना

Posted On: 27 AUG 2025 6:43PM by PIB Mumbai

 

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने (डीएएचडी) घोडे, गाढवे आणि खेचरे यांसारख्या अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या ग्लॅंडर्स या ग्रंथींना ग्रासणाऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी सुधारित राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्याचा उद्देश देशभरात या आजाराचे निरीक्षण, प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलनासाठी मजबूत उपाययोजना अधिक प्रभावी करणे, हा आहे.

सुधारित कृती आराखड्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

प्रमुख बदल- संक्रमित क्षेत्र 5 किमी वरून 2 किमी पर्यंत कमी करणे, निरीक्षण क्षेत्र 5 ते 25 किमी ऐवजी 2 ते 10 किमी असे पुनर्परिभाषित करणे आणि त्यानुसार आता निर्बंध केवळ 10 किमी पर्यंत लागू करणे.

सुधारित देखरेख आणि अहवाल देणे - स्थानिक आणि उच्च-जोखीम असलेल्या भागात घोड्यांची सक्तीची तपासणी, अत्याधुनिक प्रयोगशाळा निदान व्यवस्था आणि नियमित क्षेत्र तपासण्या.

काटेकोर विलगीकरण आणि हालचालींवर नियंत्रण - प्रभावित भागातील प्राण्यांच्या हालचालींवर कठोर निर्बंध, काटेकोर विलगीकरण पद्धती, आणि अश्वांचे मेळे, यात्रा आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी प्रमाणन पद्धती.

त्वरित प्रतिसाद यंत्रणा - राज्य पशुसंवर्धन विभागांच्या समन्वयाने लागण झालेल्या प्रकरणांचे त्वरित नियंत्रण,विलिगीकरण आणि मानवी हाताळणीसाठी मार्गदर्शक तत्वे (SOPs).

क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षण - पशुवैद्यकीय, पॅरा-पशुवैद्यकीय आणि फील्ड कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथी रोगाची ओळख, अहवाल देणे आणि जैवसुरक्षा पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम.

जनजागृती आणि भागधारक सहभाग - अश्वांचे मालक, प्रजनन आणि इतर संबंधितांसाठी रोग नियंत्रण तसेच अहवाल देण्यासाठी सहकार्य मिळावे म्हणून जनजागृती कार्यक्रम. 

संशोधन आणि प्रयोगशाळेकडून मिळणारी मदत - प्रगत निदान तंत्रज्ञान आणि रोग विज्ञानाच्या अभ्यासासाठी हिसार येथील ICAR-राष्ट्रीय घोड्यांवरील संशोधन केंद्र (NRCE) यांच्यासोबत सक्रिय सहकार्य.

सुधारित कृती आराखडा राज्य सरकारे, पशुवैद्यकीय विद्यापीठे आणि ICAR संस्थांशी जवळून समन्वय साधून अंमलात आणला जाणार असून पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग क्षेत्रीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होईल याची खात्री करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि देखरेख प्रदान करणार आहे. हा सुधारित आराखडा प्राण्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी, वन हेल्थ सज्जतेसाठी आणि देशात घोड्यांवर अवलंबून असलेल्यांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी सरकारची सतत वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

ग्रंथी रोगाबद्दल विशेष माहिती

बर्खोल्डेरिया मलेई या जीवाणूमुळे होणारा ग्लँडर्स हा आजार प्रामुख्याने घोडे, खेचर आणि गाढवे यांसारख्या प्राण्यांना होतो. तसेच हा जीवाणू इतर प्राणी तसेच मानवांसाठी धोका निर्माण करतो. हा रोग संसर्गजन्य आणि धोकादायक आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 2009 (PCICDA) अंतर्गत अधिसूचित आहे.

वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी येथे क्लिक करा.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2161374)
Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada