संरक्षण मंत्रालय
संरक्षण दल प्रमुखांनी रण संवादमध्ये विशेष दलांच्या संचालनासाठी तसेच हवाई मोहीम आणि हेलिबॉर्न मोहिमांसाठी संयुक्त सिद्धांत जारी केले
Posted On:
27 AUG 2025 1:51PM by PIB Mumbai
संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी आज 27 ऑगस्ट, 2025 रोजी मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित रण संवाद त्रि-सेवा चर्चासत्रात विशेष दल आणि हवाई मोहीम तसेच हेलिबॉर्न मोहिमांच्या संचालनासाठी संयुक्त मार्गदर्शक सिद्धांतांचे प्रकाशन केले. या कार्यक्रमास नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग उपस्थित होते.

तिन्ही दलांच्या सक्रीय सहभागातून, एकत्रित संरक्षण कर्मचारी मुख्यालयाच्या तत्वे संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे सिद्धांत तयार करण्यात आले आहेत. या तत्वांमध्ये विशेष दलांच्या मोहिमा आणि हवाई मोहिमांच्या कार्यवाहीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, कार्यपद्धतींची संकल्पना आणि आंतरसंचालनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
या प्रसंगी बोलताना, संरक्षण दल प्रमुखांनी तिन्ही सेवा दलांची व्यावसायिकता, अनुकूलता आणि संयुक्ततेसाठी वचनबद्धतेचे कौतुक केले. हे सिद्धांत बदलत्या युद्धपरिस्थितीत योजना तयार करणारे, अधिकारी आणि सैनिक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील, असे त्यांनी नमूद केले .
या सिद्धांतांचे प्रकाशन हे संयुक्त कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी, सर्व सेवांमध्ये समन्वय दृढ करण्यासाठी आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना अचूक आणि दृढनिश्चयाने तोंड देण्याच्या तयारीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे सिद्धांत खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
http://ids.nic.in/content/doctrines
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2161331)