भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

बिहार विशेष व्यापक पुनरावलोकन (एसआयआर): 98.2% मतदारांची कागदपत्रे आधीच प्राप्त, अजून 8 दिवस शिल्लक

Posted On: 24 AUG 2025 11:40AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2025

 

  1. 24 जून 2025 ते 25 जुलै 2025 या कालावधीत बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष व्यापक पुनरावलोकनाच्या (एसआयआर) गणना टप्प्याचे यशस्वी पूर्णत्व झाल्यानंतर 1 ऑगस्ट 2025 रोजी मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यासंदर्भात दावे, हरकती आणि कागदपत्रे सादर करण्याची मुदत 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 अशी आहे.
  2. भारत निवडणूक आयोगाने बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), सर्व 38 जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), 243 ईआरओ, 2,976 ,एईआरओ, 90,712 बीएलओ, लाखो स्वयंसेवक तसेच 12 प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसह त्यांचे 1.60 लाख नियुक्त बीएलए यांच्या यातील सहभागाचे कौतुक केले आहे.
  3. दावे आणि हरकतींच्या कालावधीत मतदारांना मसुदा मतदार याद्यांतील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळते तसेच गणना अर्ज सादर करताना न दिलेली आवश्यक कागदपत्रे सादर करता येतात. बिहारच्या सीईओ कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 98.2 % मतदारांची कागदपत्रे मिळाली आहेत.
  4. अशा प्रकारे 24 जून ते 24 ऑगस्ट 2025 म्हणजेच 60 दिवसांत 98.2 % लोकांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत. याचा अर्थ दररोज सरासरी सुमारे 1.64 % असा होतो. अजून 8 दिवस शिल्लक आहेत आणि फक्त 1.8 % मतदारांची कागदपत्रे बाकी आहेत. बीएलओ आणि स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांची कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गणना अर्जाप्रमाणेच कागदपत्रे गोळा करण्याचे काम वेळेआधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  5. 24 जून 2025 च्या एसआयआर आदेशानुसार 243 ईआरओ आणि 2,976 एईआरओ संबंधित कागदपत्रांची पडताळणीही एकाचवेळी करत आहेत.
  6. मसुदा याद्यांतील 7.24 कोटी मतदारांपैकी आतापर्यंत 0.16 % दावे आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत. यापैकी बिहारमधील 12 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बीएलए कडून 10, संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नसलेल्या व्यक्तींकडून शून्य, आणि संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून 1,21,143 दावे आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत.
  7. 3,28,847 नवीन मतदार ज्यांचे वय 1 जुलैपर्यंत 18 वर्षे पूर्ण झाले आहे किंवा 1 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांनीही अर्ज 6 व घोषणापत्रे सादर केली आहेत.
  8. बिहारमधील एसआयआर नियोजनानुसार सुरू आहे. प्राप्त सर्व दावे व हरकतींवर निर्णय घेणे व पात्रतेच्या कागदपत्रांची पडताळणी 25 सप्टेंबर 2025 पर्यंत संबंधित ईआरओ/एईआरओ यांनी पूर्ण करायची आहे. अंतिम तपासणीनंतर 30 सप्टेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

 

* * *

आशिष सांगळे/नितिन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160264)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil