नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जून 2025 मध्ये या योजनेत 19.37 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.
जून 2025 या महिन्यात, नव्या 34,762 आस्थापनांना कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजनेच्या सामाजिक सुरक्षा परिघात सामावून घेण्यात आले आहे, त्यामुळे अधिकाधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याची सुनिश्चिती झाली आहे.
शीर्षक
|
मे 2025
|
जून 2025
|
वृद्धी
|
या महिन्यात नव्याने नोंदणी झालेल्या युवकांची संख्या
|
9,46,843
|
9,58,979
|
12,136
|
या आकडेवारीवरुन असे लक्षात येते की या महिन्यात नव्याने योजनेत समाविष्ट झालेल्या एकूण 19.37 लाख कर्मचाऱ्यांपैकी 9.58 लाख कर्मचारी म्हणजे एकूण नोंदणीपैकी सुमारे 49.50% कर्मचारी हे 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.
तसेच, वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की जून 2025 महिन्यात 4.13 लाख निव्वळ महिला सदस्यांची नोंदणी झाली होती. याशिवाय, जून 2025 महिन्यात एकूण 87 तृतीयपंथी कर्मचाऱ्यांनी देखील ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. यातून समाजातील प्रत्येक घटकाला या योजनेचे फायदे मिळवून देण्याप्रती ईएसआयसीच्या बांधिलकीची साक्ष पटते.
आकडेवारीची निर्मिती ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे सदर वेतनपट आकडेवारी तात्पुरत्या स्वरुपाची आहे.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर