दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टपाल सेवांच्या नव्या डिजिटल युगाचा केला प्रारंभ
आयटी 2.0 ची सुरुवात - प्रगत टपाल तंत्रज्ञान: डिजिटल इंडियाच्या दिशेने इंडिया पोस्टच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा
Posted On:
19 AUG 2025 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आणि केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या मार्गदर्शनाखाली, टपाल विभागाने (डीओपी) आयटी 2.0 - प्रगत टपाल तंत्रज्ञान (एपीटी) ची यशस्वी सुरुवात केली आहे. हे ऐतिहासिक डिजिटल उन्नतन विभागाच्या 1.65 लाख टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात एक परिवर्तनकारी पाऊल आहे, जे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या दृष्टिकोनाला अनुरूप आहे. आयटी 2.0 देशाच्या कानाकोपऱ्यात जलद, अधिक विश्वासार्ह आणि नागरिक-केंद्रित टपाल आणि वित्तीय सेवा पोहचवते , जे इंडिया पोस्टच्या समावेशकता आणि सेवा उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेला दुजोरा देते.
आयटी आधुनिकीकरण प्रकल्प 1.0 च्या यशानंतर , नव्याने सुरु करण्यात आलेल्या अॅडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्ममध्ये एक मायक्रोसर्व्हिसेस-आधारित अॅप्लिकेशन आहे जे जलद, अधिक विश्वासार्ह आणि वापरकर्ता-अनुकूल नागरिक-केंद्रित सेवा प्रदान करते. सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी (सीईपीटी) द्वारे स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि विकसित केलेले, हे अॅप्लिकेशन केंद्र सरकारच्या मेघराज 2.0 क्लाउड प्लॅटफॉर्मवर होस्ट केले आहे आणि बीएसएनएलच्या देशव्यापी कनेक्टिव्हिटीची त्याला जोड आहे.
केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले ,“एपीटी इंडिया पोस्टला जागतिक दर्जाच्या सार्वजनिक लॉजिस्टिक्स संघटनेत रूपांतरित करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, हा आत्मनिर्भर भारत पूर्ण ताकदीनिशी एका मजबूत, स्वयंपूर्ण डिजिटल इंडियाचा मार्ग आखत आहे.”
ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि रचनात्मक पद्धतीने करण्यात आली. कर्नाटक पोस्टल सर्कलमधील (मे-जून 2025) यशस्वी प्रयोगानंतर, प्रणाली आणि रणनीती सुधारण्यासाठी विविध महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला. त्यानंतर देशभरात काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व 23 पोस्टल सर्कल समाविष्ट झाले, ज्याचा समारोप 4 ऑगस्ट 2025 रोजी 1.70 लाखांहून अधिक कार्यालयांसह झाला, ज्यामध्ये सर्व टपाल कार्यालये , मेल ऑफिस आणि प्रशासकीय युनिट्स एपीटीवर लाईव्ह आहेत.
तंत्रज्ञान परिवर्तनाचे यश त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन इंडिया पोस्टने "ट्रेन - रिट्रेन - रिफ्रेश" या तत्त्वाखाली मास्टर ट्रेनर्स, युजर चॅम्पियन्स आणि एंड-यूजर्सचा समावेश असलेल्या कॅस्केड मॉडेलच्या माध्यमातून 4.6 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यामुळे देशभरात प्रत्येक स्तरावर सज्जता आणि सुरळीत अवलंब सुनिश्चित झाले.
या प्रणालीने आधीच आपली लवचिकता आणि व्याप्ती दाखवून देत एकाच दिवसात 32 लाखांहून अधिक बुकिंग आणि 37 लाख डिलिव्हरी यशस्वीरित्या हाताळल्या आहेत.
आयटी 2.0 पूर्ण झाल्यानंतर, इंडिया पोस्टने विश्वास आणि अतुलनीय पोहोच यांचा वारसा कायम राखत एक आधुनिक, तंत्रज्ञान-संचालित सेवा प्रदाता म्हणून आपले स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एपीटीचे यश हे इंडिया पोस्टच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे आणि ग्रामीण-शहरी डिजिटल दरी कमी करण्यासाठी, आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्याप्रति आणि प्रत्येक नागरिकाला जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करण्याप्रति त्यांच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158195)