रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खत क्षेत्रामध्‍ये आत्मनिर्भरतेसाठी आवाहन


मृदा आरोग्याचे रक्षण करण्यासाठी खतांचा विवेकाने वापर करण्याचे पंतप्रधानांचे शेतकऱ्यांना आवाहन

देशांतर्गत खत उत्पादनाला चालना देण्यासाठीच्या वचनबद्धतेचा सरकारकडून पुनरुच्चार

Posted On: 15 AUG 2025 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025

 

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ऊर्जा स्वातंत्र्याच्या संकल्पाप्रमाणेच भारत खत क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. पंतप्रधानांनी सांगितले की, सध्या भारत आपल्या खतांच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. त्यांनी शेतकरी समुदायाला मृदा आरोग्य जपण्यासाठी खतांचा योग्य आणि शास्त्रीय वापर करण्याचे आवाहन केले. "धरणी मातेला" होणाऱ्या दीर्घकालीन हानीबद्दल सावध करत, त्यांनी खतांच्या बेसुमार वापर टाळण्‍याचा सल्ला दिला.

पंतप्रधानांनी युवा वर्ग, औद्योगिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राला एकत्र येण्याचे आवाहन करत, खतांचा पुरेसा देशांतर्गत साठा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वदेशी उत्पादनाद्वारे देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती शोधण्यास आणि विकसित करण्यास प्रोत्साहन दिले.

"चला, आपण आपले खतांचे साठे भरूया. चला, आपण नवीन पद्धती शोधूया. भारताच्या गरजेनुसार खतांचे उत्पादन करूया. आपण इतरांवर अवलंबून नको राहुया," असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सरकारने उद्योगातील हितधारक, संशोधन संस्था आणि राज्य सरकारांसोबत जवळून काम करण्याची आपली बांधिलकी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156924)
Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada