सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमएसएमई क्रेडिट सुविधा कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने खाजगी क्षेत्रातील विविध बँकासह सामंजस्य करार केले


या सहयोगाचा उद्देश एमएसएमईजना मदत आणि सल्ला प्रदान करुन त्यांना वित्तीय व्यवस्थेशी जोडणे असा आहे

Posted On: 14 AUG 2025 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2025

 

एमएसएमईंना सुलभरित्या आणि किफायतशीर पद्धतीने कर्ज उपलब्ध करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (एनएसआयसी) 11 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या एमएसएमई क्रेडिट सुविधा कार्यक्रमांतर्गत अॅक्सिस बँक, धनलक्ष्मी बँक, कर्नाटक बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि इंडसइंड बँक यांसारख्या विविध खाजगी क्षेत्रातील बँकांसोबत सामंजस्य करार केले.

या कार्यक्रमाला केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी आणि एमएसएमई  सचिव एस.सी.एल. दास उपस्थित होते. एनएसआयसीचे संचालक (वित्त) गौरव गुलाटी आणि विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. या वेळी एसएमईचे संयुक्त सचिव मर्सी इपाओ, एनएसआयसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस. एस. आचार्य तसेच एनएसआयसी आणि बँकांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सहकार्याचा उद्देश एमएसएमईंना मदत करणे आणि त्यांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडण्यास मदत करणे आहे, तसेच बँकांवर अधिक लक्ष केंद्रित करून पात्र सूक्ष्म आणि लघु उद्योगांपर्यंत त्यांची पोहोच वाढवणे असा आहे, ही व्यवस्था बँकांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना बळकटी देईल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156618)