पोलाद मंत्रालय
केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्र्यांनी ‘भारत स्टील’चा लोगो माहितीपत्रक आणि संकेतस्थळ यांचे केले उद्घाटन
Posted On:
13 AUG 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारत स्टीलच्या अधिकृत लोगोचे/ अनावरण केले, तसेच माहितीपत्रक आणि संकेतस्थळ यांचेही उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत सचिव (पोलाद) संदीप पौंड्रिक आणि पोलाद मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण पोलाद मूल्य साखळीत वाढ, नावीन्य आणि शाश्वतता वाढवण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करून, दुय्यम पोलाद क्षेत्रासाठी आयोजित कार्यशाळेदरम्यान हा शुभारंभ करण्यात आला. भारत स्टील हे पोलाद मंत्रालयाचे पोलाद परिसंस्थेवरील प्रमुख आंतरराष्ट्रीय परिषद-सह-प्रदर्शन आहे. 16-17 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जागतिक औद्योगिक नेतृत्व, धोरणकर्ते, तंत्रज्ञान पुरवठादार आणि गुंतवणूकदार एकत्र येऊन भारताच्या क्षमतांचे प्रदर्शन करतील, हरित आणि शाश्वत पोलाद निर्मितीला प्रोत्साहन देतील आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये संधींचा शोध घेतील.

या कार्यक्रमात विविध सत्रे, क्षेत्रीय गोलमेज परिषदा, राज्य आणि राष्ट्रीय गोलमेज यांच्या परिषदा, सीईओ परिषदा, तंत्रज्ञान प्रदर्शने, खरेदीदार-विक्रेता बैठका आणि प्राथमिक आणि दुय्यम पोलाद क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. सर्वात मोठे पोलाद प्रदर्शन बनण्याच्या आपल्या दृष्टिकोनासह, भारत स्टीलचे उद्दिष्ट जागतिक पोलाद उद्योगात भारताला नावीन्यपूर्णता, सहकार्य आणि गुंतवणुकीचे केंद्र म्हणून स्थापित करणे आहे. सहभाग आणि इतर तपशील https://bharat.steel.gov.in वर उपलब्ध आहेत.
* * *
निलिमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156228)