संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे नायजेरियाच्या संरक्षण राज्यमंत्र्यांबरोबर घेतली द्विपक्षीय बैठक
Posted On:
12 AUG 2025 10:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 12, ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथे नायजेरियाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. बेलो मोहम्मद मटावाले यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. उभय मंत्र्यांनी विविध क्षेत्रात वाढत्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि लष्करी संबंधांना आणखी चालना देण्याच्या उपायांवर चर्चा केली. त्यांनी दहशतवादविरोधी प्रशिक्षण, संशोधन आणि विकास, जलविज्ञान सहकार्य तसेच चाचेगिरीला प्रतिबंध आणि उद्योग सहकार्यासह सागरी सहकार्यातील संधींवर चर्चा केली.
EJKR.JPG)
संरक्षण राज्यमंत्र्यांनी हलके लढाऊ विमान, हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि गस्ती किनारी नौका यासारख्या भारतीय संरक्षण उद्योगाची उच्च दर्जाच्या संरक्षण सामग्रीचे उत्पादन करण्याची क्षमता अधोरेखित केली. नायजेरियाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भारतीय शिष्टमंडळाने संयुक्त संशोधन आणि विकास क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी नायजेरियाच्या संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या पथकाचे स्वागत करण्याची तयारी दर्शविली. नायजेरियाच्या संरक्षण राज्यमंत्र्यांनी भारतीय शिष्टमंडळाला या क्षेत्रात गुंतवणूकीची शक्यता पडताळण्यासाठी नायजेरियातील संरक्षण उद्योगाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले.

डॉ. बेलो मोहम्मद मटावाले हे 11-14 ऑगस्ट, 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. भेटीदरम्यान नायजेरियन शिष्टमंडळाने भारतीय संरक्षण उद्योगांशीही संवाद साधला.
भारत आणि नायजेरियामध्ये घनिष्ठ , मैत्रीपूर्ण, प्राचीन आणि खोलवर रुजलेले संबंध आहेत. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपासून हे संरक्षण संबंध आहेत.
* * *
सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155893)