लोकसभा सचिवालय
पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील बीकेएस मार्ग येथे खासदारांसाठी बांधलेल्या बहुमजली गृहसंकुलाचे केले उद्घाटन
लोकसभा अध्यक्षांनी संसदीय पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचे केले कौतुक
Posted On:
11 AUG 2025 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील बाबा खडक सिंह (बीकेएस) मार्गावर 184 सदनिका असलेल्या नव्याने बांधलेल्या टाइप-7 सदनिकांच्या बहुमजली वास्तूचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्री मनोहर लाल, केंद्रीय संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, खासदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन गृहसंकुलाचे उद्घाटन केल्याबद्दल आणि खासदारांसाठी, जनतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे आता संसद भवनाजवळ लोकसभा सदस्यांसाठी पुरेशी घरे उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल आणि त्यांच्या संसदीय कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करता येईल.
अध्यक्षांनी नमूद केले की, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, गेल्या अकरा वर्षांत लोकसभा सदस्यांसाठी 344 नवीन घरे बांधण्यात आली आहेत.
स्वयंपूर्ण निवासी संकूल म्हणून डिझाइन केलेल्या, या प्रकल्पामध्ये हरित तंत्रज्ञानाच्या वापराचा समावेश आहे आणि या इमारतींना 3- स्टार मानांकन आहे. तसेच त्यांचे बांधकाम करताना राष्ट्रीय इमारत संहिता (एनबीसी) 2016 चे पालन केले आहे. वैशिष्ट्यांमध्ये ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली, वीज बॅकअप, अक्षय ऊर्जा निर्मिती, प्रभावी कचरा व्यवस्थापन, भूकंप-प्रतिरोधक संरचना, दिव्यांग-अनुकूल सुविधा आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश आहे. प्रत्येक युनिटमध्ये निवासी आणि कार्यालयीन कारणांसाठी पुरेशी जागा प्रदान केली आहे. ज्यामध्ये कार्यालयीन क्षेत्रे, कर्मचारी निवास आणि समुदाय केंद्र यासारख्या अतिरिक्त सुविधा आहेत.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155316)
Visitor Counter : 4