युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
सायकलिंगमुळे फिटनेस राखला जातो, सायकलिंग हा प्रदूषणावरचा उपाय आहे, आणि सायकलिंग आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या भावनेशी जोडते : केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया
Posted On:
10 AUG 2025 3:28PM by PIB Mumbai
स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी आज दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दिल्ली मध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमाचे 35 वे पर्व यशस्वीपणे संपन्न झाले. यात केंद्रीय श्रम आणि रोजगार, तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राजधानी दिल्लीतील नागरिकांसोबत भाग घेत सायकल चालवली.

या सायकल रॅलीला जवाहरलाल नेहरू स्टेडियममधून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही मोहीम डिसेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या देशव्यापी सायकलिंग चळवळीचा भाग आहे, आणि आता या मोहिमेचे साप्ताहिक फिटनेस कार्यक्रमात रूपांतर झाले आहे. या आठवड्यात, भारतातील 2.5 लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना या चळवळीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी डॉ. मांडविया यांनी उपस्थितांना संबोधित केले. सायकलिंगच्या विविध फायद्यांबद्दल त्यांनी सांगितले. सायकलिंगमुळे व्यक्तीच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाचे आरोग्यही चांगले राहते. सायकलिंगमुळे आपण तंदुरुस्त राहतो, सायकलिंग हा प्रदूषणावरचाही उपाय आहे असे त्यांनी सांगितले. यासोबतच सायकलिंग आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या भावनेशी जोडते, असे त्यांनी नमूद केले.

आज देशातील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये, पंचायत प्रतिनिधींनी या मोहिमेत भाग घेऊन फिट इंडियाचा संदेश दिला आहे आणि आपापल्या गावांना या चळवळीशी जोडले आहे, असे ते म्हणाले. केवळ रविवारीच नाही, तर दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून सायकलिंगचा अंगिकार करावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यामुळे फिट इंडियाचा संदेश सर्वदूर पोहोचेल आणि सायकल हे वाहतुकीचे एक लोकप्रिय साधन बनेल असे ते म्हणाले.

तीन वेळा ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेले, अर्जुन पुरस्कार विजेते तसेच ज्युनियर राष्ट्रीय रायफल संघाचे प्रशिक्षक रायफल नेमबाज संजीव राजपूत हे या मोहिमेत विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. मानदुखीच्या त्रासामुळे धावू न शकणाऱ्या लोकांसाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. सायकलिंगमुळे मन आणि शरीरात उत्तम समन्वय निर्माण होतो, अशी माहिती राजपूत यांनी दिली.

***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154877)
Visitor Counter : 4