भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक व्यवस्थेची स्वच्छता : निवडणूक आयोगाने 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांना (RUPPs) सूचीमधून वगळले

Posted On: 09 AUG 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2025

 

  1. देशातील राजकीय पक्षांची (राष्ट्रीय / राज्य / बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष - RUPPs) लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29A च्या तरतुदींनुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली जाते.
  2. सध्या, निवडणूक आयोगाकडे 6 राष्ट्रीय पक्ष 67 राज्य पक्ष आणि 2854 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी आहे. (परिशिष्ट : राष्ट्रीय आणि राज्य पक्षांची यादी)
  3. राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर एखाद्या पक्षाने सलग 6 वर्षे निवडणुका लढवल्या नाहीत, तर त्या पक्षाचे नाव नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळले जाईल.
  4. याव्यतिरिक्त, लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29A नुसार, पक्षांना नोंदणीच्या वेळी त्यांचे नाव, पत्ता, पदाधिकारी इत्यादी तपशील देणे गरजेचे असते तसेच कोणत्याही बदलाची माहिती आयोगाला तात्काळ कळवणे आवश्यक असते.
  5. यापूर्वी, जून 2025 मध्ये, निवडणूक आयोगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) वरील नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही यासंबधी 345 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांची (RUPPs) पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.
  6. यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी केली, या बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांना (RUPPs) कारणे दाखवा नोटीस पाठवली तसेच प्रत्येक पक्षाला त्यांची बाजू मांडण्यासाठी वैयक्तिक सुनावणीची संधी दिली.
  7. त्यानंतर, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात, एकूण 345 बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांपैकी (RUPPs) 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष (RUPPs) वर नमूद अटींचे पालन करत नसल्याचे आढळले. तर उर्वरित प्रकरणांची पुन्हा पडताळणी केली जावी यासाठी ती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे परत पाठवण्यात आली आहेत.
  8. सर्व तथ्ये आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर आयोगाने 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष (RUPPs) वगळले आहेत. (दुवा: https://www.eci.gov.in/list-of-political-parties). आता, एकूण 2854 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांपैकी (RUPPs) 2520 शिल्लक आहेत. ही कार्यवाही म्हणजे निवडणूक व्यवस्था पूर्णतः निर्दोष करण्याच्या  निवडणूक आयोगाच्या  सर्वसमावेशक आणि निरंतर धोरणाचा हा एक भाग आहे.
  9. हे बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष (RUPPs) लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29B आणि 29C मधील तरतुदींनुसार, प्राप्तीकर कायदा, 1961 आणि निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 शी संबंधित कोणत्याही  तरतुदींनुसार कोणताही लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत. या आदेशाने बाधित झालेला कोणताही पक्ष, आदेशाच्या 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अपील करू शकतो.

 

परिशिष्ट

मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष

अ.क्र.

राजकीय पक्षाचे नाव

1

आम आदमी पार्टी

2

बहुजन समाज पार्टी

3

भारतीय जनता पार्टी

4

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)

5

इंडियन नॅशनल काँग्रेस

6

नॅशनल पीपल्स पार्टी

 

मान्यताप्राप्त राज्य पक्ष

अ.क्र.

राजकीय पक्षाचे नाव

अ.क्र.

राजकीय पक्षाचे नाव

1

एजेएसयू पार्टी

2

ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम

3

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक

4

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

5

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस

6

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस

7

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट

8

अपना दल (सोनेलाल)

9

आसाम गण परिषद

10

भारत आदिवासी पार्टी

11

 

भारत राष्ट्र समिती

 

12

 

बिजू जनता दल

 

13

 

बोडोलँड पीपल्स फ्रंट

 

14

 

सिटिझन ॲक्शन पार्टी - सिक्कीम

 

15

 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया

 

16

 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी लेनिनवादी) (लिबरेशन)

 

17

 

देसिया मुप्पोकू द्रविड कळघम

 

18

 

द्रविड मुन्नेत्र कळघम

 

19

 

गोवा फॉरवर्ड पार्टी

 

20

 

हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी

 

21

 

इंडियन नॅशनल लोक दल

 

22

 

इंडियन युनियन मुस्लिम लीग

 

23

 

इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा

 

24

 

जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स

 

25

 

जम्मू आणि काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टी

 

26

 

जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी

 

27

 

जनसेना पार्टी

 

28

 

जनता दल (धर्मनिरपेक्ष)

 

29

जनता दल (संयुक्त)

30

 

जननायक जनता पार्टी

 

31

 

जनता काँग्रेस छत्तीसगड(जे)

 

32

 

झारखंड मुक्ती मोर्चा

 

33

 

केरळ काँग्रेस

 

34

 

केरळ काँग्रेस (एम)

 

35

 

लोक जनशक्ती पार्टी

 

36

 

लोक जनशक्ती पार्टी (राम विलास)

 

37

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

38

 

महाराष्ट्रवादी गोमंतक

 

39

 

मिझो नॅशनल फ्रंट

 

40

 

नाम तमिळर कटची

 

41

 

नागा पीपल्स फ्रंट

 

42

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 

43

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

 

44

 

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी

 

45

 

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट

 

46

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल

47

राष्ट्रीय जनता दल

 

48

राष्ट्रीय लोक समता पार्टी

49

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी

50

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

51

रिव्होल्यूशनरी गोअन्स पार्टी

52

रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी

53

समाजवादी पार्टी

54

शिरोमणी अकाली दल

55

शिवसेना

56

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

57

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट

58

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा

59

तेलुगु देसम पार्टी

60

टिपरा मोथा पार्टी

61

युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी

62

युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल

63

विदुथलाई चिरुथैगल कटची

64

व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी

65

युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी

66

झोरम नॅशनलिस्ट पार्टी

67

झोरम पीपल्स मूव्हमेंट

 

 

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154753) Visitor Counter : 65