पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी संसदेत तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या एका गटाची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2025 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या एका गटाची भेट घेतली. उत्पादकतेत वाढ करण्यासाठी तसेच शाश्वतता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचा हा गट नवनवीन कल्पना आणि नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर देत असलेला भर याबद्दल तसेच त्यांचे अनुभव ऐकून आश्चर्यचकित झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

आज संसदेत तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या एका गटाला भेटलो. त्यांच्या अनुभवांबद्दल तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शाश्वतता वाढवण्यासाठी नवोन्मेषी कल्पना आणि शेती विषयक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा असलेला भर पाहून मी आश्चर्यचकित झालो.

 

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2153854) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam