सांस्कृतिक मंत्रालय
स्थानिक भाषेला प्रोत्साहन
Posted On:
07 AUG 2025 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
देशातील स्थानिक भाषा तसेच सांस्कृतिक परंपरा यांचे संवर्धन तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार कार्यरत आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था 24 भाषांमधील भारतीय साहित्याच्या प्रसारासाठी काम करत आहे . साहित्य अकादमी ही संस्था केवळ मान्यताप्राप्त भाषांच्याच नव्हे तर विशेषतः माहिती नसलेल्या आणि आदिवासी भागातील भाषांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी काम करते.
भारतातील फारशा माहिती नसलेल्या आणि आदिवासी जमातींच्या भाषांचे संवर्धन तसेच त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या भाषांमधील लेखक विद्वान आणि संशोधक यांना साहित्य अकादमी भाषा सन्मान प्रदान करते.
दरवर्षी 9 ऑगस्ट या दिवशी अकादमी जागतिक मूलनिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यासाठी, अखिल भारतीय आदिवासी लेखक परिषद भरवते. याशिवाय मौखिक आणि आदिवासी साहित्याच्या जतनासाठी व अशा साहित्याला चालना देण्यासाठी साहित्य अकादमीने आगरतळा आणि दिल्ली येथे या कामांसाठी विशेष केंद्रे स्थापन केली आहेत.
भारतीय सरकार स्वदेशी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी राज्यस्तरावरच्या संस्थांशी समन्वय साधून काम करत आहे. साहित्य अकादमी ही भारताची महत्त्वाची साहित्य संस्था आहे. ही संस्था राज्यस्तरावरच्या अकादमी विद्यापीठे यांच्याशी नियमित समन्वयाने तसेच मान्यताप्राप्त साहित्यिक संस्थांसह स्थानिक कार्यक्रम, परिषदा, आणि कार्यशाळा यांचे आयोजन मान्यताप्राप्त तसेच फारशा माहित नसलेल्या भारतीय भाषांचा प्रसार आणि विकास साधण्याच्या हेतूने करते.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2153768)