आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत 6 ऑगस्टपासून वनौषधी सुरक्षा आणि नियमन यावर डब्ल्यूएचओ-आयआरसीएच कार्यशाळेचे करणार आयोजन


व्यावहारिक प्रशिक्षण, केस स्टडीज आणि जागतिक नियामक संवाद हे या तीन दिवसीय तांत्रिक बैठकीचे असणार वैशिष्ट्य

Posted On: 05 AUG 2025 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्‍ट 2025

 

भारत 6 ते 8 ऑगस्ट, 2025 दरम्यान  गाझियाबाद मधील हॉटेल फॉर्च्यून डिस्ट्रिक्ट सेंटर येथे प्रतिष्ठित डब्ल्यूएचओ-आंतरराष्ट्रीय वनौषधी नियामक सहकार्य (आयआरसीएच) कार्यशाळेचे आयोजन करणार आहे. आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहकार्याने आणि फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी (PCIM&H) च्या पाठिंब्याने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्ताने वनौषधींची  नियमन क्षमता मजबूत करण्यासाठी जागतिक तज्ञ आणि नियामक एकाच मंचावर येतील.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि डब्ल्यूएचओ-आयआरसीएच चे अध्यक्ष डॉ. किम सुंगचोल करतील. भूतान, ब्रुनेई, क्युबा, घाना, इंडोनेशिया, जपान, नेपाळ, पॅराग्वे, पोलंड, श्रीलंका, युगांडा आणि झिम्बाब्वे या देशांचा प्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे, तर ब्राझील, इजिप्त आणि अमेरिका दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील.

ही कार्यशाळा आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि तांत्रिक आदानप्रदानासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.  सहकार्याला चालना देणे, सुरक्षितता आणि प्रभावी तंत्राला चालना देणे, नियामक व्यवस्थेला  समर्थन देणे आणि जागतिक स्तरावर पारंपरिक औषध प्रणालींना सक्षम बनवणे ही याची पाच प्रमुख उद्दिष्टे आहेत.

ठळक वैशिष्ट्यांमध्ये डब्ल्यूएचओ-आयआरसीएच  कार्यगट 1 आणि 3 चा आढावा समाविष्ट आहे जो वनौषधींची  सुरक्षितता, नियमन, परिणामकारकता आणि इच्छित वापरावर केंद्रित आहे. याशिवाय प्री-क्लिनिकल संशोधन, नियामक चौकटी आणि सुरक्षितता केस स्टडीजवरील सत्रे होणार असून यामध्ये अश्वगंधा (विथानिया सोम्निफेरा) वर विशेष  चर्चा समाविष्ट आहे.

सहभागींना PCIM&H प्रयोगशाळांमध्ये एचपीटीएलसी तंत्रज्ञानाचा वापर करून वनौषधी ओळख, हेवी मेटल विश्लेषण आणि किमो -प्रोफाइलिंगमधील प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. कार्यशाळेत पारंपरिक औषधांची सुरक्षितता देखरेख मजबूत करण्याच्या उद्देशाने आयुष सुरक्षा (फार्माकोव्हिजिलन्स) कार्यक्रम देखील सुरु  केला जाईल.

भारताच्या एकात्मिक आरोग्य परिसंस्थेबाबत सखोल माहिती देण्यासाठी, कार्यशाळेला आलेले प्रतिनिधी PCIM&H, राष्ट्रीय युनानी औषध संस्था, गाझियाबाद आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA), नवी दिल्ली येथे भेट देतील.

विविध महाद्वीपांचे नियामक अधिकारी आणि तज्ञांच्या सहभागासह, ही कार्यशाळा जागतिक मानके सुसंगत  बनवण्यासाठी आणि मुख्य प्रवाहातील सार्वजनिक आरोग्य प्रणालींमध्ये पारंपारिक औषधांच्या सुरक्षित, प्रभावी एकीकरणाला चालना देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2152693)