सांस्कृतिक मंत्रालय
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचा समावेश
Posted On:
04 AUG 2025 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025
पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात यावर्षी झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत 12 मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचा समावेश असलेल्या "भारतातील मराठा लष्करी व्यवस्था " या मालमत्तेचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. या किल्ल्यांची यादी परिशिष्ट I मध्ये जोडली आहे.
युनेस्कोच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतातील मराठा लष्करी व्यवस्थांचा समावेश निकष (iv) आणि (vi) अंतर्गत करण्यात आला आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देशभरातील संरक्षित स्मारके आणि स्थळांचे संवर्धन आणि देखभालीचे काम पाहते, ज्यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, मार्ग आणि लँडस्केपिंग इत्यादी सुविधांची तरतूद समाविष्ट आहे. स्मारके आणि पुरातत्व स्थळांचे संवर्धन आणि देखभाल ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि स्मारकांच्या गरजेनुसार आणि संसाधनांच्या उपलब्धतेनुसार केली जाते. मात्र स्मारकांच्या गरजेनुसार निधी वितरित केला जातो. गेल्या तीन वर्षात मुंबई परिमंडळाअंतर्गत केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या संवर्धन आणि देखभालीसाठी वितरित केलेल्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
अनु क्र.
|
वर्ष
|
वितरित निधी (कोटी रुपये)
|
1
|
2022-23
|
15.35
|
2
|
2023-24
|
15.56
|
3
|
2024-25
|
12.58
|
सध्या, महाराष्ट्रातील 2 आणि मध्य प्रदेशातील 11 मालमत्ता जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र झारखंडमधील कोणत्याही मालमत्तेचा तात्पुरत्या यादीत समावेश नाही. जागतिक वारसा नामांकनासाठी पुढे जाण्यासाठी तात्पुरत्या यादीत समावेश करणे अनिवार्य आहे. तात्पुरत्या यादीत समाविष्ट असलेल्या मालमत्तांची माहिती परिशिष्ट II मध्ये दिली आहे.
तात्पुरत्या यादीत महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील कातळशिल्प आणि कोकण किनारपट्टीवरील तटीय किल्ले क्रमिक नामांकन यांचा समावेश आहे.
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2152292)