पोलाद मंत्रालय
आर्थिक वर्ष ’26 मध्ये मॉयल (MOIL) ने जुलैमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक उत्पादनाची केली नोंद
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2025 9:41AM by PIB Mumbai

प्रतिकूल हवामान परिस्थिती असूनही, मॉयल (MOIL) ने जुलै 2025 मध्ये 1.45 लाख टन मँगनीज धातूचे उत्पादन केले आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 12% ची उल्लेखनीय वाढ नोंदवली.
अतिवृष्टी असूनही, मॉयलने एप्रिल-जुलै 2025 दरम्यान मजबूत परिचालन गती राखत 6.47 लाख टन (वर्ष-दर-वर्ष 7.8% वाढ) उत्पादन, 5.01 लाख टन (गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10.7% अधिक ) विक्री आणि 43,215 मीटर एक्सप्लोरेटरी ड्रिलिंग (गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.4% अधिक ) अशी उल्लेखनीय कामगिरी केली.
मुख्य व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मॉयल टीमचे अभिनंदन केले आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीतही उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांचे कौतुक केले.
***
SonalTupe/SushamaKane/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2152042)
आगंतुक पटल : 20