अवजड उद्योग मंत्रालय
प्रधानमंत्री ई-ड्राईव्ह योजनेंतर्गत देशव्यापी ईव्ही चार्जिंग सुविधा देणार
Posted On:
01 AUG 2025 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
प्रधानमंत्री ई-ड्राईव्ह (पीएम ई-ड्राईव्ह) योजनेअंतर्गत देशभरातील विविध प्रकारच्या वाहनांसाठी पुरेशा इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने 2 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती पोलाद, अवजड उद्योग राज्य मंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. ऊर्जा मंत्रालयाने दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे (पत्र क्रमांक 12/2/2018-ईव्ही) खासगी उद्योजकांना सार्वजनिक चार्जिंग केंद्रे उभारण्यासाठी सुविधा पुरविण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत शहरांच्या हद्दीत ईव्ही चार्जिंग केंद्रे उभारण्याबरोबरच निवडक आंतरशहरी आणि आंतरराज्य महामार्गांनाही ईव्ही सुसज्ज बनवण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि प्राधिकरणे, राज्य सरकारे, तसेच केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे, असे भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांनी सांगितले.
सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151538)