रसायन आणि खते मंत्रालय
रेल्वे स्थानकांवर प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे सुरू
देशभरात 30.6.2025 पर्यंत एकूण 16,912 जनौषधी केंद्रांचे काम सुरू
Posted On:
01 AUG 2025 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेअंतर्गत, विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसह नागरिकांना दर्जेदार, परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी 30.6.2025 पर्यंत देशभरातील रेल्वे स्थानकांवर एकूण 106 जनौषधी केंद्रे (JAKs) उघडण्यात आली आहेत.
दिनांक 30.6.2025 पर्यंत एकूण 16,912 जनौषधी केंद्रे देशभरात उघडण्यात आली आहेत, त्यापैकी 8,660 जनौषधी केंद्रे ग्रामीण भागात उघडण्यात आली आहेत. ग्रामीण भागात सुविधा वाढविण्यासाठी, या योजनेने प्राथमिक कृषी पतसंस्थांसारख्या इतर सहकारी संस्थांमार्फंत अशाप्रकारची जनौषधी केंद्रे उघडण्यासाठी सहकार मंत्रालयाशी भागीदारी केली आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागांसह देशभरात दररोज सरासरी 10 ते 12 लाख लोक या केंद्रांना भेट देतात आणि परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे घेतात. यामुळे , गेल्या 11 वर्षांत, ग्रामीण आणि दुर्गम भागांसह देशभरातील ब्रँडेड औषधांच्या किमतींच्या तुलनेत नागरिकांची सुमारे 38,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
औषधांचा किती साठा करायचस याविषयी सरकारचे काही आदेश आहेत, त्यानुसार जनौषधी केंद्रांचे मालक त्यांच्याकडे असलेल्या 200 उत्पादनांच्या साठ्यावर आधारित प्रोत्साहनपर रकमेचा दावा करण्यास पात्र ठरतात.
यासंबंधी केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/संपदा पाडगावंकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151528)