ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री घरकूल योजना – ग्रामीण अंतर्गत पक्क्या घरांची बांधणी सुरु


केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून प्रधानमंत्री घरकूल -ग्रामीण

Posted On: 01 AUG 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025

(पीएमएवाय- जी) योजनाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागांतील पात्र कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी सहाय्य प्रदान केले जाते. "सर्वांसाठी घरकूल" हे उद्दिष्ट साध्य करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. केंद्र शासनाने  घरकूल  प्लस  (2018) यादीतील (अद्ययावत केल्यानंतर) आणि  उर्वरित  एसईसीसी 2011 कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील पात्र कुटुंबांना घरे देण्यासाठी, प्रधानमंत्री घरकूल  योजना - ग्रामीण (पीएमएवाय- जी) ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 या कालावधीत एकूण 2 कोटी पक्क्या घरांच्या बांधकाम करण्‍यासाठी  सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.  ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

घर बांधणीच्या ठरवलेल्या टप्प्याची पूर्तता झाल्यावर आणि  त्या टप्प्याचा वेळ, दिनांक आणि भौगोलिक स्थान असलेला फोटो ‘आवाससॉफ्ट’ प्रणालीमध्ये ‘आवास अ‍ॅपद्वारे अपलोड केल्यानंतरच लाभार्थ्याला हप्त्याच्या रकमेचे वितरण केले जाते. या योजनेअंतर्गत, मंजुरीपूर्वी  सध्याच्या जागेचा आणि   प्रस्तावित जागेचा समावेश करून, घराच्या प्रत्येक टप्प्याचे भौगोलिक स्थान  आणि  वेळेसह छायाचित्र अपलोड करणे गरजेचे आहे. मंत्रालयाच्या आवास अ‍ॅप  या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमार्फत हे काम सुलभ होते. 29 जुलै 2025 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय- जी) अंतर्गत लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यापूर्वी 3.84 कोटी घरांच्या जागांचे भौगोलिक टॅगिंग करण्यात आले आहे, असे पेम्मासानी यांनी सांगितले.


सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2151466)