भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 2025


निर्वाचक गण तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली

Posted On: 31 JUL 2025 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2025

1. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार, भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर सोपवण्यात आली आहे.

2. भारतीय राज्यघटनेच्या कलम 66(1) नुसार, भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड राज्यसभा आणि लोकसभेचे सर्व सदस्य (निवडून आलेले आणि नामनिर्देशित) मिळून बनलेल्या 'निर्वाचक गणा'द्वारे (Electoral College) केली जाते. 

3.राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, 1974 च्या नियम 40 च्या अनुपालनानुसार, निवडणूक आयोगाला या निर्वाचक गणाच्या (Electoral College) सदस्यांची अद्ययावत यादी आणि त्यांचे नवीनतम पत्ते तयार करून ठेवणे अनिवार्य आहे.

4. त्यानुसार, आयोगाने उपराष्ट्रपती निवडणूक, 2025 साठी निर्वाचक गणाची यादी अंतिम केली आहे. या सदस्यांची नावे त्यांच्या संबंधित सभागृहाच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार वर्णक्रमानुसार (alphabetically) मांडणी करून एकाच क्रमाने सूचीबद्ध केली आहेत.

5.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिसूचनेच्या तारखेपासून, निवडणूक आयोगामध्ये उभारलेल्या काउंटरवर निर्वाचक गणाची  यादी खरेदीसाठी उपलब्ध असेल. ही अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.


सोनाली काकडे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2150937)