रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणाऱ्या दरात प्रवासासाठी रेल्वे वचनबद्ध आहे; आधुनिक अमृत भारत गाड्या जागतिक तोडीच्या अनुभवासह बिगर -वातानुकूलित रेल्वे प्रवास नव्याने परिभाषित करतात

Posted On: 30 JUL 2025 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

रेल्वेने सामान्य श्रेणीतील प्रवास  करणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1250 जनरल डबे वापरण्यात आले आहेत.

खाली दिलेल्या माहितीनुसार, बिगर वातानुकूलित डब्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढून सुमारे 70% झाले आहे:

तक्ता 1: डब्यांचे वितरण:

बिगर वातानुकूलित डबे( जनरल आणि स्लीपर)

~57,200

~70%

वातानुकूलित डबे

~25,000

~30%

एकूण डबे

~82,200

100%

 

जनरल डब्यांच्या उपलब्धतेमुळे जनरल/अनारक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत खालीलप्रमाणे वाढ झाली आहे :

तक्ता 2: सामान्य/अनारक्षित डब्यांमधील प्रवासी:

वर्ष

प्रवाशांची संख्या

2020-21

99 कोटी (कोविड वर्ष)

2021-22

275 कोटी (कोविड वर्ष)

2022-23

553 कोटी

2023-24

609 कोटी

2024-25

651 कोटी

 

गेल्या काही वर्षांत बिगर वातानुकूलित प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या जागांची संख्याही वाढली आहे. सध्याची रचना खालीलप्रमाणे आहे:

तक्ता 3: जागांचे वितरण:

बिगर वातानुकूलित जागा

~ 54 lakhs

~ 78%

वातानुकूलित जागा

~ 15 lakhs

~ 22%

एकूण

~ 69 lakhs

100%

 

जनरल आणि बिगर वातानुकूलित स्लीपर डब्यांमधून‌ प्रवास करणाऱ्या अधिक प्रवाशांना सामावून घेण्याच्या दृष्टीने 22 मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या रचनेबाबतच्या विद्यमान धोरणात 22 डब्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये 12 (बारा) जनरल वर्गाचे आणि स्लीपर क्लास बिगर वातानुकूलित डबे आणि 08 (आठ) वातानुकूलित डब्यांची तरतूद आहे.

याशिवाय, अनारक्षित प्रवाशांच्या गरजा पूर्ण करत भारतीय रेल्वे परवडणाऱ्या प्रवासासाठी अनारक्षित बिगर वातानुकुलीत  पॅसेंजर ट्रेन/मेमू/ईएमयू इत्यादी चालवते, ज्या मेल/एक्सप्रेस सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या अनारक्षित व्यवस्थे (डबे) व्यतिरिक्त असतात.

अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा विकास, मेमू गाड्यांचे उत्पादन आणि जनरल डब्यांचा हिस्सा वाढवणे यावरून स्पष्ट होते की भारतीय रेल्वे जनरल वर्गातील प्रवासाची मागणी प्रभावीपणे पूर्ण करत आहे.

सध्याच्या बिगर वातानुकूलित डब्यांच्या उच्च वाट्याव्यतिरिक्त (एकूण कोचच्या ~70%), रेल्वे पुढील 5 वर्षांत 17,000 बिगर वातानुकूलित जनरल/स्लीपर डब्यांसाठी एक विशेष उत्पादन कार्यक्रम राबवत आहे.

भारतीय रेल्वेने पूर्णपणे बिगर वातानुकूलित अमृत भारत गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्या सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरेखित आणि उत्पादित केल्या आहेत, ज्यामुळे बिगर वातानुकूलित विभागातील प्रवाशांना जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळतो. भारतीय रेल्वेने 100 अमृत भारत गाड्यांचे उत्पादन करण्याची तरतूद केली आहे.

उच्च गती, सुधारित सुरक्षा मानके आणि जागतिक दर्जाची सेवा ही या गाड्यांची वैशिष्ट्ये आहेत.

सेवेचा खर्च, सेवेचे मूल्य, प्रवाशांना काय परवडू शकते, इतर स्पर्धात्मक मार्गांमधील स्पर्धा, सामाजिक-आर्थिक बाबी इत्यादींचा योग्य विचार करून भारतीय रेल्वे भाडे निश्चित करते. विविध गाड्या/वर्गांचे भाडे या गाड्यांमध्ये उपलब्ध केलेल्या सुविधांवर आधारित असते. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या रेल्वे सेवा चालवते.

ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150325)