आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशभरातील नोंदणीकृत थॅलेसेमिया रुग्णांबाबत अद्यतनित माहिती
जुलै 2025 पर्यंत, देशभरात 4361 थॅलेसेमिया रुग्णांची नोंदणी झाली, ज्यात 12 वर्षांखालील 2,579 मुलांचा समावेश
थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कोल इंडिया लिमिटेडकडून अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची मदत
Posted On:
29 JUL 2025 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2025
जुलै 2025 पर्यंत, सिकल सेल पोर्टलवर देशभरातील एकूण 4361 थॅलेसेमिया रुग्णांची नोंदणी झाली आहे, त्यापैकी 2579 मुले 12 वर्षांखालील आहेत.
2023 मध्ये, सिकल सेल पोर्टलमध्ये एक स्वतंत्र थॅलसेमिया मॉड्युल समाविष्ट करण्यात आले होते, ज्याद्वारे राज्ये विद्यमान थॅलेसेमिया रुग्णांची माहिती पोर्टलवर नोंदवू शकतात. राष्ट्रीय पोर्टलवर नियमित निरिक्षण, पाठपुरावा आणि तपासणी संदर्भात डेटा नोंदवला जात आहे. त्यामुळे देशभरातील थॅलेसेमिया रुग्णांची देखभाल आणि देखरेख व्यवस्था बळकट होत आहे.
थॅलेसेमियाच्या व्यवस्थापन आणि जनजागृती यांची प्राथमिक जबाबदारी संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांची आहे. याबाबत जागरूकता निर्माण करणे देखील आवश्यक आहे. मात्र, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपली सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी मदत केली जाते ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये थॅलेसेमिया प्रतिबंध आणि व्यवस्थापन, रक्तपेढी सुविधांची तरतूद, डे केअर सेंटर, औषधे, प्रयोगशाळा सेवा, जनजागृती उपक्रम आणि मनुष्यबळ प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे. ही मदत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारकडून सादर करण्यात कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याच्या आधारावर दिली जाते.
थॅलेसेमिया बाल सेवा योजना (TBSY) ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कोल इंडिया लिमिटेड च्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी दहा लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत कॉल इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून दिली जाते. ही योजना देशभरातील 17 मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये ही अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवा उपलब्ध आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149916)