पर्यटन मंत्रालय
'चलो इंडिया' अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान
Posted On:
28 JUL 2025 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2025
भारतीय पर्यटन मंत्रालयाने ‘चलो इंडिया’ हा उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत अनिवासी भारतीयांनी अतुल्य भारताचे दूत बनून आपल्या भारतेतर मित्रांना दरवर्षी भारत भेटीवर येण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पर्यटन मंत्रालयाने केले आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत, 30 ई-पर्यटन व्हिसा जारी करण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारतातील पर्यटन स्थळे आणि उत्पादने- विशेषतः अल्पपरिचित पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक वारसा स्थळे यांचा प्रचार प्रसार करून भारताचा जागतिक पर्यटन बाजारातील वाटा वाढवणे हा आहे. पर्यटन मंत्रालय परदेशातील भारतीय दूतावासांबरोबर तसेच पर्यटन व्यवसायातील भागीदार आणि राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या सहकार्याने परदेशातील संभाव्य स्रोत बाजारपेठांमध्ये पर्यटन प्रचारात्मक उपक्रम राबवत आहे, जेणेकरून देशात पर्यटकांची संख्या वाढेल.
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149406)