नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ हे प्रेरणा, शिक्षण आणि पर्यावरण जाणीवेचे दीपस्तंभ : सर्बानंद सोनोवाल यांचे गौरवोद्गार

Posted On: 27 JUL 2025 7:47PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ च्या आजच्या  भागाबाबत मनःपूर्वक गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणा व शिक्षण यांचा एक अद्भुत विचारमंच जो भारताच्या राष्ट्रनिर्माण व पर्यावरणाप्रती  संवेदनशीलतेच्या  भावनेचे  गौरव करतो असे सोनोवाल यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांच्या संबोधनाला प्रतिसाद देताना सोनोवाल म्हणाले, “देशाच्या प्रत्येक भागातून ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रेरणादायी कथा व परिवर्तन घडवणारे उपक्रम समोर आणतो. हा एक समृद्ध करणारा असा कार्यक्रम बनला असून, तो फक्त शिक्षण देत नाही तर आत्म्यालाही विकसित करतो.”

या प्रसारणाचा खोलवर परिणाम सांगताना सोनोवाल पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जागतिक प्रतिष्ठा आणि लोकांशी असलेली नाळ लक्षात घेता, ‘मन की बात’ हे असे एक प्रभावी माध्यम आहे जे नागरिकांना थेट पंतप्रधानांकडून  ऐकण्याची संधी देते आणि अधिक मजबूत, एकसंघ भारत निर्माण करण्याच्या दिशेने प्रेरित करते.”

पंतप्रधानानी  काझीरंगा या गेंड्यासाठी प्रसिद्ध  राष्ट्रीय उद्यानाच्या  समृद्ध पक्षीविविधतेचा उल्लेख केला, ही गोष्ट आसाम आणि ईशान्य भारतासाठी अत्यंत गौरवाची आहे. गवताळ प्रदेशातील पक्ष्यांची झालेली पहिलीच जनगणना आणि त्यासाठी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर ही पर्यावरण संरक्षणासाठी आशादायक वाट आहे.”

या भावना नमुद करत सोनोवाल म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे मानवजाती व निसर्ग यांच्यातील शाश्वत सहजीवनाचा मार्ग स्पष्ट होतो. पर्यावरणाबद्दल दयाभाव आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण हा  पंतप्रधानांचा  दृष्टिकोन आपल्यासाठी एक शिकवण आहे आणि पुढच्या पिढीसाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभही आहे.”

मंत्री म्हणाले की ‘मन की बात’ हा कार्यक्रम आजही प्रेरणा, जागरूकता आणि सामूहिक राष्ट्रीय अभिमान यांची संस्कृती रुजवणारा एक मार्गदर्शक प्रकाश आहे.

***

निलिमा चितळे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2149146)