नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भातील प्रगती

Posted On: 22 JUL 2025 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025

 

भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर वर स्थित वाढवण बंदर हे खोल सागरी प्रदेशातले (deep-draft port) बंदर आहे. या बंदरामुळे भारताची कंटेनर हाताळणी क्षमता 23.2 दशलक्ष टीईयुने म्हणजेच वीस-फूट समतुल्य युनिटने वाढेल असा अंदाज आहे. या नवीन बंदराच्या विकासामुळे जागतिक सागरी केंद्रांमध्ये भारताचे स्थान अधिक भक्कम होणार आहे.

याअंतर्गतचे प्रमुख करार आणि कौशल्य विकास कार्यक्रमाचे तपशील खाली नमूद केले आहेत:

  1. वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ: वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यात  सामंजस्य करार झाला आहे.
  2. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि शिपिंग महासंचालनालय वाढवण प्रदेशातील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना निवडक सागरी प्रशिक्षण संस्थांमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.
  3. वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड आणि सह्याद्री फार्म्स: वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच कृषी-मूल्य साखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  4. बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांसोबत अवजड वाहने चालवणे  यांत्रिकीकरण विषयक सहकार्यपूर्ण भागिदारी : बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांसोबतच्या सहकार्यपूर्ण भागीदारीअंतर्गत अवजड वाहने चालवणे  आणि यांत्रिकीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत.
  5. कौशल्य कार्यक्रमासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट : वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडने वाढवण मधील युवकांशी संवाद साधण्यासाठी एक विशेष व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू केला आहे, ज्यामुळे संभाव्य उमेदवारांकरता कौशल्य कार्यक्रमाची माहिती मिळवणे आणि त्यासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.

ही माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2146891)
Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese