वस्त्रोद्योग मंत्रालय
हातमाग विणकरांसाठी कल्याणकारी योजना
Posted On:
22 JUL 2025 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2025
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय देशभरात राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (एनएचडीपी) अंतर्गत हातमाग विणकर/कामगारांच्या कल्याणासाठी खालील योजना राबवत आहे:
- निर्धन परिस्थितीत राहणाऱ्या, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा 60 वर्षांवरील पुरस्कार विजेत्या हातमाग विणकर/कामगारांना, दरमहा 8,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि केंद्र/राज्य सरकार मान्यताप्राप्त/अनुदानित वस्त्रोद्योग संस्थांमधून पदविका /पदवीपूर्व /पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेण्यासाठी हातमाग विणकर/कामगारांच्या मुलांना (2 मुलांपर्यंत) वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती.
- नैसर्गिक/अपघाती मृत्यू आणि पूर्ण/आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) या विमा योजनांद्वारे सार्वत्रिक आणि किफायतशीर सामाजिक सुरक्षा.
वाणिज्यिक गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार अपशिष्टासह कच्चा कापूस आणि सूत, वस्त्र, तयार कपडे यासह कापड उद्योगांची एकूण निर्यात 3 वर्षात 35,642 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स झाली आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2146805)