जलशक्ती मंत्रालय
स्वच्छता पंधरवडा 2025 दरम्यान प्रमुख क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर विशेष भर
Posted On:
21 JUL 2025 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
स्वच्छता पंधरवडा हा स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत एक उपक्रम आहे. भारत सरकारच्या सर्व मंत्रणालयांना आणि विभागांना सहभागी करून स्वच्छता संबंधित समस्या आणि पद्धतींवर सखोल लक्ष केंद्रीत करण्याच्या उद्देशाने एप्रिल 2016 मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रत्येक वर्षी मंत्रालये/विभागांना पंधरवड्याच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात मदत करण्यासाठी एक वार्षिक दिनदर्शिका आगाऊ प्रसारित केली जाते. या वर्षीही, पेयजल आणि स्वच्छता विभागाने (DDWS) केंद्रीय मंत्रालये/विभागांसाठी 2025 या वर्षासाठी स्वच्छता पंधरवडा दिनदर्शिका तयार केली आहे.
नोडल विभाग म्हणून, पेयजल आणि स्वच्छता विभागाने (DDWS) स्वच्छता पंधरवडा 2025 साठी सूचना देणारे उपक्रम आखले आहेत. मंत्रालये/विभागांना त्यांच्या संबंधित समुदायांमध्ये आणि परिसंस्थेमध्ये प्रत्यक्ष श्रमदान उपक्रमांमध्ये भाग घेण्याचा, तसेच त्यांच्या संबंधित संस्था आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धात्मक भावना वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ते कार्यालयातील स्वच्छता उपक्रमांवर आणि समाज/समुदायातील प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करतील. पेयजल आणि स्वच्छता विभाग मंत्रालये/विभागांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि समर्पित स्वच्छता पंधरवडा पोर्टलवर अपडेट्स ट्रॅक करून प्रगतीचे नियमितपणे निरीक्षण केले जाते, जेणेकरून सातत्यपूर्ण सुधारणा सुनिश्चित करता येईल.
केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146591)