संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबादमधील संरक्षण संशोधन आणि विकास केंद्राच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिली भेट

Posted On: 18 JUL 2025 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2025

 

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 16 आणि 17 जुलै 2025 रोजी हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास  केंद्राच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला, भेट दिली.

यावेळी त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमारत (RCI) आणि क्षेपणास्त्र क्लस्टर प्रयोगशाळांच्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळेद्वारे  (ASL) राबवल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि शस्त्र प्रणाली निर्मिती कार्यक्रमाचा आढावा घेतला.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी डीआरडीएलच्या अ‍ॅस्ट्रा एमके I आणि II, उभ्या पल्ल्याचे शॉर्ट-रेंज सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र आणि स्क्रॅमजेट इंजिन सुविधा अशा विविध निर्मिती केंद्रांना भेट दिली, त्यावेळी  केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि महासंचालक (क्षेपणास्त्रे आणि धोरणात्मक प्रणाली) यू राजा बाबू आणि डीआरडीएलचे संचालक श्री जी ए श्रीनिवास मूर्ती, यांनी त्यांना येथील विविध प्रकल्पांच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली.

तसेच संजय सेठ यांनी आरसीआयच्या विविध महत्त्वाच्या अति महत्वाच्या केंद्रांनाही  भेट दिली, आणि त्यांनी यावेळी आरसीआयचे संचालक श्री अनिंद्य बिस्वास यांनी त्यांना स्वदेशी नेव्हिगेशन/एव्हिएशन सिस्टीम, ऑनबोर्ड संगणक विभाग आणि इमेजिंग इन्फ्रा-रेड सीकर यांच्याकडून सुविधांच्या प्रगतीची माहिती घेतली.

अत्याधुनिक शस्त्र प्रणालींद्वारे आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले.सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांना बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी वैज्ञानिक समुदायाला केले.

शैलेश पाटील/संपदा पाडगांवर/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2145956)