अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अवजड उद्योग मंत्रालयाने ‘विकसित भारत@2047' दृष्टीकोनाला अनुसरून भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राला पुढे नेणारा धोरणात्मक पथदर्शी उपक्रम असलेला ऑटोमोटिव्ह मिशन प्लान 2047 (एएमपी 2047) सुरु केला

Posted On: 17 JUL 2025 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2025


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह मिशन प्लान 2047 (एएमपी 2047) सुरु  केला असून, तो ‘विकसित भारत @2047’ या दृष्टिकोनाला अनुसरून धोरणात्मक रोडमॅप (पथदर्शी उपक्रम) आहे. भागधारकांच्या सहकार्याने भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात लक्षणीय विकासाला चालना देणाऱ्या यापूर्वीच्या ऑटोमोटिव्ह मिशन योजनांच्या यशाचा आधार घेत, 2047 साला पर्यंत भारताला जागतिक ऑटोमोटिव्ह नेतृव म्हणून प्रस्थापित करण्यासाठी, नवोन्मेश, जागतिक स्पर्धात्मकता आणि शाश्वत विकास वाढवणे, हे एएमपी 2047 चे उद्दीष्ट आहे.

उपक्रमाची उद्दीष्टे आणि आराखड्याची रूपरेषा ठरवण्यासाठी एएमपी 2047 च्या उपसमित्यांची उद्घाटनपर बैठक आयोजित करण्यात आली होती. एमएचआयचे अतिरिक्त सचिव डॉ. हनीफ कुरेशी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “2047 चा दृष्टीकोन म्हणजे आकांक्षा नसून क्षेत्रीय विकास, निर्यात आणि उद्योगाच्या प्रगतीसाठी ठोस उद्दिष्टांचा आधार असलेला धोरणात्मक आराखडा आहे. आपण विशिष्ट तंत्रज्ञान अथवा कंपन्यांच्या पलीकडे विचार करायला हवा, तसेच नवोन्मेश आणि गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक ऑटोमोटिव्ह व्यापारात आपला वाटा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत 2047 मधील भारताच्या जागतिक स्थानावर लक्ष केंद्रित करायला हवे.”

एएमपी 2047, तांत्रिक प्रगती आणि महाग होत असलेल्या पायाभूत सुविधा, यासारख्या  आव्हानांचा सामना करण्यासाठी उपकरणाचे मूळ उत्पादक (ओईएम), ऑटो घटक उत्पादक, धोरणकर्ते, शिक्षण तज्ञ आणि अंतिम वापरकर्त्यांसह भागधारकांच्या सामूहिक दृष्टीकोनाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करते. सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या सात उपसमित्या 2030, 2037 आणि 2047 मधील महत्वाचे टप्पे लक्षात घेत, एक सर्वसमावेशक योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतील.

अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, मंत्रालय आत्मनिर्भर, नवोन्मेशी आणि शाश्वत ऑटोमोटिव्ह परिसंस्था तयार करण्यासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित करत आहे. उपसमित्यांच्या विविध बैठकींमध्ये एकत्र केलेल्या कल्पना आणि डेटा अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव कामरान रिझवी यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च समितीसमोर सादर केला जाईल. मंत्रालय सर्व भागधारकांचे त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानत आहे आणि 2047 साला पर्यंत विकसित भारत साकार करण्यामधील त्यांच्या योगदानाची अपेक्षा करत आहे.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2145620) Visitor Counter : 2