सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        नियतकालिक श्रमिक बळ सर्वेक्षण (पीएलएफएस) – मासिक वार्तापत्र (जून 2025)
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                15 JUL 2025 8:06PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली 15 जुलै 2025
 
महत्त्वाचे निष्कर्ष
	- वय वर्षे 15 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा विद्यमान साप्ताहिक स्थितीतील (सीडब्ल्यूएस) श्रमिक बळ सहभाग दर (एलएफपीआर) मे 2025 मधील 54.8% च्या तुलनेत जून 2025 मध्ये 54.2% इतका होता. याच वयोगटातील व्यक्तींसाठी जून 2025 मध्ये ग्रामीण भागातील एलएफपीआर 56.1% तर शहरी भागातील एलएफपीआर 50.4% होता.
- जून 2025 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांसाठीचा सीडब्ल्यूएस मधील एलएफपीआर अनुक्रमे 78.1% आणि 75.0% इतका होता. मे 2025 मध्ये याच वयोगटातील ग्रामीण आणि शहरी भागातील पुरुषांसाठीचा एलएफपीआर अनुक्रमे 78.3% आणि 75.1% होता त्यात आता किंचित घट झालेली दिसून येत आहे.
- जून 2025 मध्ये 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांचा एलएफपीआर 35.2% होता.
- जून 2025 मध्ये ग्रामीण भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा सीडब्ल्यूएसमधील कामगार लोकसंख्या दर (डब्ल्यूपीआर) 53.3% होता. जून 2025 मध्ये शहरी भागात याच वयोगटातील व्यक्तींचा डब्ल्यूपीआर 46.8% होता तसेच मे 2025 मध्ये देशपातळीवर समग्र डब्ल्यूपीआर 51.7% इतका राहिला, त्याच्या तुलनेत जून 2025 मध्ये हा समग्र डब्ल्यूपीआर 51.2% असल्याचे दिसून आले.
- जून 2025 मध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांचा डब्ल्यूपीआर अनुक्रमे 33.6% आणि 22.9% राहिला तर देशपातळीवर या वयोगटातील महिलांचा समग्र डब्ल्यूपीआर 30.2% होता.
- वय वर्षे 15 आणि त्याहून जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठीचा सीडब्ल्यूएसमधील बेरोजगारी दर (युआर) मे 2025 आणि जून 2025 या दोन्ही महिन्यांमध्ये सारखाच म्हणजे 5.6% होता.
- महत्त्वाचे निष्कर्ष तसेच सर्वेक्षण पद्धतींची माहिती या बातमी सोबत जोडलेल्या परिशिष्ट I आणि II मध्ये दिले आहेत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
 
* * *
सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2144995)
                Visitor Counter : 10