संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरातील समुद्रात अडकलेल्या अमेरिकी नौकानयन बोटीतील दोन कर्मचाऱ्यांना वाचवले

Posted On: 11 JUL 2025 11:21AM by PIB Mumbai

अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात, इंदिरा पॉइंटच्या आग्नेयेला 52 सागरी मैलांवर समुद्रात अडकलेल्या ‘सी एंजेल’ या अमेरिकी नौकानयन बोटीसाठी भारतीय तटवर्ती दलाने (आयसीजी) बचाव मोहीम हाती घेतली. दोन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बोट, अत्यंत कठीण हवामानात शीड उडून गेल्यामुळे तसेच प्रॉपेलर अडकून पडल्यामुळे एका जागी अडकली होती.

या संकटाचा इशारा मिळताच पोर्ट ब्लेयरच्या सागरी बचाव समन्वय केंद्राने (एमआरसीसी) परिसरातील व्यापारी जहाजांना सावध केले आणि बचाव समन्वय नियमावलीलागू केली. त्यानंतर आयसीजीचे राजवीर या जहाजाला मोहिमेसाठी नेमल्यावर जहाजाने अडकलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आणि घटनास्थळाची माहिती घेतली. जोरदार वारे आणि यांत्रिकी बिघाडाच्या स्थितीत देखील अडकलेल्या बोटीवरील कर्मचारी सुरक्षित आणि तंदुरुस्त असल्याचे आढळले. आज, दिनांक 11 जुलै, 2025 च्या सकाळी, ही बोट यशस्वीरीत्या टो करून जवळच्या कॅम्पबेल बे बंदरावर आणण्यात आली.

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143963)