उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा बौद्धिक आणि सांस्कृतिक महत्व वाढीसह झाला पाहिजे : उपराष्ट्रपती


कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद विचारांची मौलिकता आणि मूल्यांच्या कालातीतपणात असते- उपराष्ट्रपती

Posted On: 10 JUL 2025 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2025

"जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा बौद्धिक आणि सांस्कृतिक महत्व वाढीसह झाला  पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याशिवाय होणारी वाढ चिरंतन नसेल आणि ती आपल्या परंपरांशी सुसंगत नसेल, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राष्ट्राची ताकद त्याच्या विचारांची मौलिकता, त्याच्या मूल्यांची चिरंतनता आणि त्याच्या बौद्धिक परंपरांच्या लवचिकतेत असते. 'सृजनशील सामर्थ्य' असे आहे जे टिकून राहते, आणि आपण ज्या जगात राहतो तिथे 'सृजनशील सामर्थ्य' अतिशय प्रभावी आहे," असे ते म्हणाले.

ते आज नवी दिल्लीत भारतीय ज्ञान प्रणाली वरील पहिल्या वार्षिक परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.वसाहतवादी रचनांच्या मर्यादांच्या पलीकडे भारताची ओळख असल्याचे अधोरेखित करत उपराष्ट्रपती म्हणाले, "भारत म्हणजे केवळ विसाव्या शतकाच्या मध्यात तयार झालेली एक राजकीय रचना नाही. तो एक सभ्यतागत अखंड प्रवाह आहे – जाणीव, जिज्ञासा  आणि शिक्षणाची एक अखंड वाहणारी नदी आहे, जी युगानुयुगे टिकून आहे."

"युरोपातील विद्यापीठे अस्तित्वात येण्यापूर्वीच, भारतातील विद्यापीठांनी शिक्षणाची परिपूर्ण केंद्रे म्हणून स्वतःला प्रस्थापित केले होते. आपली ही प्राचीन भूमी बौद्धिक जीवनाची तेजस्वी केंद्रे होती – तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि ओदंतपुरी. हे ज्ञानाचे भव्य प्रासाद होते. त्यांची ग्रंथालये ज्ञानाचे अथांग महासागर होती, जिथे हजारो हस्तलिखिते जतन केलेली होती, " असे ते म्हणाले.

"ही जागतिक विद्यापीठे होती, जिथे कोरिया, चीन, तिबेट आणि पर्शियासारख्या जवळच्या आणि दूरच्या देशांतून ज्ञानप्राप्तीची आसक्ती असलेले येत असत. ही अशी ठिकाणे होती जिथे जागतिक बौद्धिक संपदेत  भारतीयत्वाचा भाव विलिन झालेला होता."

ज्ञानाच्या अधिक समग्र आकलनाचे आवाहन करताना उपराष्ट्रपती म्हणाले, "ज्ञान केवळ हस्तलिखितांपुरते मर्यादित नाही. ते समुदायांमध्ये, आचरणात आणलेल्या प्रथांमध्ये, आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या  ज्ञान हस्तांतरणात  वास करते.

भारतीय ज्ञान प्रणालींना बळकट करण्यासाठी केंद्रित कृतीचा आग्रह धरत उपराष्ट्रपती म्हणाले, "आपण सर्व, आपले लक्ष ठोस कृती करण्याकडे वळवूया, कारण ही काळाची गरज आहे."

परंपरा आणि नवोन्मेष यांच्यातील गतिशील संबंधांचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले, "भूतकाळातील ज्ञान नवोन्मेषात अडथळा आणत नाही—उलट ते नवोन्मेषासाठी  प्रेरणा देते."


N.Chitale/S.Patil/P.Malndkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2143764)