युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
महिलांच्या उत्थानाचे कार्य केले जाते , त्याचवेळी संपूर्ण देशाची प्रगती : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
Posted On:
09 JUL 2025 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खेलो इंडिया मान्यताप्राप्त अकादमी उपक्रमांतर्गत उत्कृष्टतेचा दीपस्तंभ असलेल्या मोदीनगर येथील वेटलिफ्टिंग वॉरियर्स अकादमीला भेट दिली. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू, मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा, आयडब्ल्यूएलएफचे अध्यक्ष सहदेव यादव, आणि आयडब्ल्यूएलएफ चे सीईओ अश्विनी कुमार हे देखील त्यांच्या बरोबर उपस्थित होते.

खेलो इंडिया मान्यताप्राप्त अकादमी - खेलो इंडिया योजनेचा गेम चेंजर (परिवर्तन घडवणारा) घटक आहे. या अकादमीमध्ये खेलो इंडिया योजनेच्या निकषांचे पालन केले आहे. या वेटलिफ्टिंग वॉरियर्स अकादमीमध्ये एक आधुनिक, पूर्णपणे सुसज्ज जिम आहे. सध्या, ही अकादमी 8 ते 14 वयोगटातील 40 होतकरू युवा खेळाडूंना ऊर्जा देणारे एक केंद्र आहे, जे क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहेत.
उत्साही युवा खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना रक्षा खडसे म्हणाल्या,"खेलो भारत नीती (धोरण) 2025" अंतर्गत, आम्ही एक अशी परिसंस्था तयार करत आहोत, जी केवळ प्रतिभेचा शोध घेत नाही, तर जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सामुदायिक सहभागाद्वारे ती टिकवून ठेवते. मला याची जाणीव आहे की, ज्यावेळी महिला उत्थानाचे कार्य केले जाते, त्यांना पुढे आणले जाते – त्यावेळी संपूर्ण देशाची प्रगती होते, आणि आपण कोणतीही प्रतिभा झाकून ठेवणार नाही. किंवा कोणतीही आकांक्षा अपुरी न ठेवण्यात येणार नाही, असा आपण संकल्प केला आहे.”

अकादमीमध्ये मीराबाई चानूसारख्या प्रतिष्ठित खेळाडूची उपस्थिती युवा प्रशिक्षणार्थींसाठी एक शक्तिशाली प्रेरणास्रोत ठरणार आहे. खेलो इंडिया उपक्रमाद्वारे मिळालेले समर्पित प्रशिक्षण आणि उत्कृष्ट सुविधांचा लाभ घेऊन यशाची केवढी उंची गाठता येते, हे यामुळे दिसून आले.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143406)