खाण मंत्रालय
सप्ततारांकित आणि पंचतारांकित खाणींचा गौरव समारंभ
Posted On:
06 JUL 2025 5:18PM by PIB Mumbai
खाण मंत्रालयांतर्गत असलेले भारतीय खाण खाते , 2023-24 वर्षासाठी देशभरातल्या 7 आणि 5 तारांकित खाणींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 7.07.2025 रोजी जयपूर इथे या गौरव कार्यक्रमात विविध मान्यवर, भागधारक आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित राहाणार आहेत.
या कार्यक्रमाला, केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्यास संमती दर्शवली आहे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच केंद्रीय कोळसा व खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. खाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय लोहिया देखील कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.
खाणींना तारांकित करण्याची संकल्पना 2014-15 मध्ये अस्तित्वात आली, त्यामुळे खाण संचालकांमध्ये सकारात्मक आणि स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती केल्याबद्दल खाण समुदायामध्ये व्यापक प्रशंसा मिळवली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली मान्यता आणि दर्शवलेल्या कामगिराला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली पावती यामुळे खाण कामगारांच्या कामात सुधारणा होण्यास मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते तसेच खाण उद्योगासाह स्थानिक समुदायांनाही त्याचे प्रत्यक्ष/ठोस फायदे मिळत आहेत. हा कार्यक्रम, शाश्वत विकास चौकटीत राहून राष्ट्रीय पातळीवरील खाणकामगारांचे मूल्याकन करतो, ज्याचा मुख्य उद्देश सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आरोग्याचे रक्षण करतानाच, सर्वसमावेशक वाढीला चालना देणे हा आहे.
या कार्यक्रमादरम्यान, 7 तारांकित 3 खाणींना आणि 5 तारांकित 95 खाणींना 2023-24 वर्षासाठी गौरवण्यात येणार आहे. जयपूरच्या राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये या कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
***
S.Patil/VSS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142751)