कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान 3 आणि 4 जुलै रोजी देणार जम्मू आणि काश्मीरला भेट


केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक होईल तसेच कृषी ग्रामीण विकास आणि विद्यापीठाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतील

Posted On: 02 JUL 2025 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2025

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे 3 आणि 4 जुलै 2025 रोजी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवस या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते काही उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील तसेच शेती ग्रामीण विकास आणि शिक्षणाशी संबंधित काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. 3 जुलैला सकाळी ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे तसेच ग्रामीण विकास विभागाने श्रीनगरच्या सचिवालयात आयोजित केलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. दुपारी ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने नैसर्गिक शेती तसेच राष्ट्रीय तेलबिया योजना या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहतील. त्याच दिवशी संध्याकाळी ते जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या सन्मानार्थ राजभवनात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहतील.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान शेर ए काश्मीर (SKUASP-K) विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा समारंभ श्रीनगरमध्ये विद्यापीठाच्या शालिमार पदवीदान केंद्रामध्ये होईल. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू मनोज सिन्हा तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि SKUASP-K चे प्र-कुलगुरू ओमर अब्दुल्ला हे सुद्धा उपस्थित राहतील.

पदवीदान समारंभात 5,250 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी पदव्या प्रदान करण्यात येतील. याशिवाय 150 सुवर्णपदके आणि 445 गुणवत्ता प्रमाणपत्र विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतील.

पदवीदान समारंभानंतर शिवराज सिंह चौहान SKUAST– K विद्यापीठाच्या परिसरातील केशर आणि सफरचंदाच्या बागांना भेट देतील आणि उद्यान कृषी विद्या शास्त्रज्ञांबरोबर तसेच शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतील. यानंतर ते खोनमोह गावातील लखपती दीदींची भेट घेतील.


S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2141635)